Samsung च्या पुढील स्मार्टफोन्ससोबत Chargers आणि Earbuds न मिळण्याची शक्यता
Samsung (Photo Credit: Fortune)

मोबाईल फोन इंडस्ट्रीमधील मोठी कंपनी सॅमसंग (Samsung) यांनी आपल्या येणाऱ्या नवीन फोन्सबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे येणाऱ्या सॅमसंगच्या मोबाईल फोनसोबत चार्जर (Chargers) दिला जाणार नाही. दरम्यान, हळूहळू हा निर्णय अंमलात आणला जाईल. मोबाईल अॅक्सेसरीज कमी केल्याने फोन अधिक सस्टनेबल (Sustainable) होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. (Samsung Galaxy S21 Series च्या प्री बुकींगला सुरुवात; 29 जानेवारी रोजी पहिला सेल)

The Verge ने दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंग मोबाईल कंपनीकडे सँमसंग गॅलेक्सी सोबत इतर मोबाईल रेंजेस सुद्धा आहेत. बजेट फोनसोबत सध्या चार्जर दिला जाईल. परंतु, हाय एन्ड असलेल्या मोबाईल फोन सोबत चार्जर मिळणार नाही. कालांतराने बजेट फोन सोबतही चार्जर मिळणार नाही.

बजेट फोन सोबत चार्जर देणे कंपनीला गरजेचे आहे. कारण बजेट फोन मधून चार्जर काढून टाकल्यास सामान्य जनतेचा सॅमसंग मोबाईलकडे कल कमी होत जाईल. हाय एन्ड मोबाईल विकत घेणाऱ्या युजर्संना वेगळा चार्जर विकत घेणे परवडणारे आहे. परंतु, सामान्य जनतेचे मोबाईल बजेट यामुळे डगमगू शकते. त्यामुळे सॅमसंगने चार्जर काढून टाकण्याची प्रक्रीय हळूहळू सुरु केली आहे.

The Verge च्या माहितीनुसार, सॅमसंग हा ब्रँड अॅपलला फॉलो करत आहे, अलिकडेच अॅपलने आपल्या आयफोन्स मधून  चार्जरसह इतर अॅक्सेसरीज काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच लॉन्च झालेल्या सॅमसंग नोट 20 अल्ट्रा आणि नोट 10 सोबत चार्जर दिला जाणार आहे. (Samsung Lunch 110" Micro LED TV: सॅमसंग ने लॉन्च केला 110 इंचाचा नवा मायक्रो LED टीव्ही; जाणून घ्या, काय आहे किंमत आणि खासियत?)

मोबाईल फोन्ससोबत इतर मोबाईल अॅक्सेसरीज बनवण्याकडेही सॅमसंग लक्ष केंद्रीत करत आहे. सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टवॉचेस, फिटनेस बँड, ईयर बर्ड्स यांच्या निर्मितीकडे सॅमसंगचा कल आहे.