Samsung Lunch 110
Samsung TV (Photo Credits: Twitter)

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने (Samsung Electronics) आज एक नवा मायक्रो एलईडी टीव्ही (Micro LED TV) लॉन्च केला आहे. या नव्या टीव्हीमुळे दक्षिण कोरियाचे टेक तज्ज्ञ युजर्संना मनोरंजनाचा एक सुखद अनुभव देऊ इच्छित आहेत. योनहाप वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या टीव्हीची प्री-ऑर्डर या महिन्यापासून सुरु होईल आणि 2021 च्या पहिल्या तिमाही पर्यंत याची अधिकृतपणे लॉन्चिंग करण्यात येईल. हा टीव्ही अमेरिका, मध्य पूर्व आणि काही युरोपीय देशांत विकण्याचा सॅमसंगचा उद्देश आहे. त्यानंतर त्याची विक्री वैश्विक स्तरावर विस्तारीत करण्यात येईल.

सॅमसंगचे व्हिज्युअल डिस्प्ले बिजनेसचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट चू जोंग-सुक यांनी एका ऑनलाईन ईव्हेंटमध्ये सांगितले की, "सॅमसंग ने मायक्रो एलईडी टीव्ही बाजार बनवण्याचे आणि त्याचे नेतृत्व करण्याचे लक्ष्य आहे. या टीव्हीची मोठ्या प्रमाणात विक्री होईल, असा आम्हाला विश्वास आहे."

Samsung Electronics Tweet:

नव्याने लॉन्च करण्यात आलेला मायक्रो एलईडी टीव्ही मायक्रोमीटर आकाराच्या एलईडी चिप्स सिंग्युलर पिक्सेलच्या रुपात वापरतो. त्यामुळे चांगले रिजोल्यूशन आणि हाय क्लियारिटी मिळते. सॅमसंगने पहिल्यांदा वॉल एलईडी डिस्प्ले 2018 मध्ये 'द वॉल' नावाने ब्रांड अंतर्गत कमर्शियल वापरासाठी लॉन्च केले होते. परंतु, आता होम सिनेमासाठी चांगला प्रॉडक्ट देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या 110 इंचाच्या मायक्रो एलईडी टीव्हीची किंमत 1,56,400 डॉलर इतकी असेल.

भविष्यात 70 इंच ते 100 इंच या आकारातील मायक्रो एलईडी टीव्ही आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सॅमसंगने सांगितले होते. त्याचा नवा 110 इंचाचा मायक्रो एलईडी टीव्ही 3.3-चौरस मीटर क्षेत्रात 8 दशलक्ष आरजीबी एलईडी चिप्स वापरतो. त्यामुळे तो 4 रेज्योल्यूशनची क्वालिटी प्रदान करतो. यात मायक्रो एआय प्रोसेसर देखील आहे.