Samsung कंपनीच्या 'या' स्मार्टफोन्समध्ये यापुढे मिळणार नाही अपडेट
Samsung (Photo Credit: Fortune)

स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगच्या (Samsung) चाहत्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! आता सॅमसंगच्या A सीरिजच्या (A Series) काही ठराविक फोन्समध्ये कंपनीचे लेटेस्ट अपडेट मिळणार नाही. या स्मार्टफोन्समध्ये गॅलेक्सी A7 2017, गॅलेक्सी A5 2017 आणि गॅलेक्सी A3 2017 ला आता कंपनीचे लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट न देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. याशिवाय गॅलेक्सी J3 पॉप ला सुद्धा कंपनीकडून सपोर्ट मिळणार नाही. त्यामुळे हे स्मार्टफोन्स खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांनी वा ज्यांच्याकडे हे स्मार्टफोन्स आहेत त्यांनी या गोष्टींची खबरदारी घ्यावी.

यासोबतच गॅलेक्सी A सीरिजच्या बंद झालेल्या सपोर्टची माहिती अॅनड्रॉईड पोलिसांनी एका रिपोर्टमध्ये दिली आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड 5G ला सुद्धा आता अपडेट मिळणार नाही.हेदेखील वाचा- Samsung Galaxy A72 स्मार्टफोन लवकरचं होणार लाँच; जाणून घ्या संभाव्य किंमत आणि फिचर्स

गॅलेक्सी S9 सीरिजसह आतापर्यंतच्या सर्व फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर आतासुद्धा प्रत्येक महिन्यात लेटेस्ट सिक्योरिटी अपडेट मिळतो. कंपनीने आपल्या फोल्डेबल फोन गॅलेक्सी फोल्ड आणि गॅलेक्सी Z फोल्ड 2 ला 3 महिन्यासाठी सिक्योरिटी अपडेट मिळत आहे.

दरम्यान सॅमसंगचा A सीरिजचा नवा स्मार्टफोन A72 लवकरच भारतात लाँच होणार आहे. सॅमसंगचा आगामी फोन Galaxy A72 फेब्रुवारीच्या उत्तरार्धात बाजारात येईल. या स्मार्टफोनची किंमत बजेटमध्ये असेल. कंपनीने गॅलेक्सी ए 72 च्या लॉन्चिंग, किंमत आणि फीचर्सबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

Samsung Galaxy A52 5G स्मार्टफोन लवकरचं बाजारात येणार आहे. फोन ब्ल्यूटूथ आणि वायफाय प्रमाणपत्र साइटवर सूचीबद्ध करण्यात आलं आहे. Wifi लिस्टिंगनुसार, Samsung Galaxy A52 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड असेल. त्यामध्ये ड्युअल बँड वाय-फाय 5 चा सपोर्ट मिळेल. मागील आठवड्यात Galaxy A52 5G अनेक प्रमाणपत्र साइटवर सूचीबद्ध करण्यात आली होती. हा स्मार्टफोन 2021 च्या उत्तरार्धात लॉन्च केला जाऊ शकतो.