Galaxy (Photo Credits-Facebook)

सॅमसंग गॅलेक्सी S22 सीरिजची प्री बुकिंग येत्या 23 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. गॅलेक्सी एस22 सीरिजचा सेल 11 मार्च 2022 पासून असणार असल्याने ग्राहकांना त्याच्या खरेदीवर धमाकेदार ऑफर्स मिळणार आहेत. गॅलेक्सी एस22 अल्ट्राच्या प्री बुकिंगवर ग्राहकांना 26999 रुपयांचे गॅलेक्सी वॉच4 फक्त 2999 रुपयांना मिळणार आहे. तसेच गॅलेक्सी एस22+ आणि गॅलेक्सी एस22 ची प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 11999 रुपयांचे गॅलेक्सी बड्स 2999 रुपयांना मिळणार आहे. गॅलेक्सी एस आणि गॅलेक्सी नोट सीरिजच्या ग्राहकांना 8000 रुपयांचा अपग्रेड बोनस दिला जाणार आहे. तर अन्य डिवाइस धारकांना 5 हजार रुपयांचा अपग्रेड बोनस मिळणार आहे. जे ग्राहक सॅमसंग फाइनान्स+ च्या माध्यमातून हे डिवाइस खरेदी करण्याचा विचार करत असल्यास त्यांना 5 हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे.

Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा Edge QHD+ Dynamic एमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. सुपर 120Hz रिफ्रेस्ड रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट दिला गेला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस22 अल्ट्राला 4nm आधारित Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर  दिला गेला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस22 अल्ट्रा अॅन्ड्रॉइड 12 आधारित One UI 4.1 वर काम करणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस22 अल्ट्रा स्मार्टफोन 5000mAh च्या बॅटरी सपोर्टसह येणार आहे. जो 15W वायरलेस, 45W वायर्ड आणि वायरलेस पॉवर शेअर सपोर्ट दिला गेला आहे.

Galaxy S22 Ultra (12/512GB) -118,999 रुपयांना खरेदी करता येईल. यामध्ये ग्राहकांना Burgundy, Phantom Black कलर ऑप्शन मिळणार आहे. गॅलेक्सी एस22 अल्ट्रा (12/256GB)- 109,999 रुपयांना आहे. यामध्ये कलर ऑप्शन Burgundy, Phantom Black, Phantom White मिळणार आहे. (OnePlus कडून स्मार्ट टीव्ही सीरिज लॉन्च, जाणून घ्या फिचर्सबद्दल अधिक)

सॅमसंग गॅलेक्सी एस22 आणि एस22+ मध्ये फ्रंटला तुम्हाला 10 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. तर अल्ट्रा फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले जाणार आहेत. तसेच 50PM चा वाइड कॅमेरा आणि 10 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा मिळणार आहे. दोन्ही फोनमध्ये 3700mAh ची बॅटरी दिली गेली आहे.