Samsung Galaxy Note 10 स्मार्टफोनवर तब्बल 27 हजार रुपयांची सूट, खरेदी करण्याची उत्तम संधी
Samsung Galaxy Note 10 (Photo Credits: Twitter)

सॅमसंगने (Samsung) फेस्टिव सीजनमध्ये त्यांच्या दमदार स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स देणार असल्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 वर बेस्ट डिल्स मिळणार आहेत. सॅमसंगने गॅलेक्सी नोट 10 या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 27,695 रुपयांची घट केली आहे. त्यामुळे याची किंमत 45 हजार रुपये झाली आहे. मात्र ऑफलाइन किंवा रिटेल पद्धतीने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. त्याचसोबत ऑनलाईन खरेदीवर सुद्धा फोनवर डिस्काउंट दिला जात आहे. मात्र ऑफलाइन खरेदीवर अधिक फायदा होणार आहे.

गॅलेक्सी या स्मार्टफोनची लॉन्चिंगवेळी किंमत 69,999 रुपये होती. मात्र सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर 57,100 रुपये त्याची किंमत आहे. तर रिटेल स्टोरमध्ये याची किंमत 45 हजार रुपये आहे. तर अॅमेझॉनवर याची किंमत 73,600 रुपये आहे. तसेच अॅमेझॉनवर याची किंमत 73,600 रुपये आहे.(Flipkart Big Diwali Sale आज पासून सुरु, मोबाईल फोन आणि टिव्हीच्या खरेदीवर मिळणार दमदार ऑफर)

91mobiles च्या रिपोर्टनुसार, Samsung Galaxy Note 10 ची किंमतीमध्ये सर्व कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. हा फोन 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या अन्य फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये 6.3 इंचाचा Infinity-O Dynamic AMOLED डिस्प्ले असणारा गॅलेक्सी नोट 10 चा स्क्रिन रेज्यॉल्यूशन 2280X1080 पिक्सल आहे. सॅमसंगच्या या फ्लॅगशिप फोनमध्ये Exynos9825 SoC प्रोसेसर दिला आहे. जो लॉन्चिंगच्या वेळी सर्वाधिक पॉवरफुल चिपसेट होता. फोन अॅन्ड्रॉइड 9 आणि अॅन्ड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टिमसह लॉन्च केला आहे.(LG Wing आणि LG Velvet Dual Screen स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या या धमाकेदार फोन्सचे फिचर्स आणि किंमत)

तसेच सॅमसंग गॅलेक्सी नोटमध्ये 3500mAh ची बॅटरी दिली आहे. जो 25 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. तर कॅमेऱ्या बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनचा प्रायमरी सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे. त्यानंतर 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स दिली आहे. तसेच 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 चा कॅमेरा अत्यंत जबरदस्त असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये लाइव्ह फोकस व्हिडिओ, झूम इन माइक, सुपर स्टिडी, हायपरलेप्स, एआर डूडल आणि नाइट मोडसह अन्य काही आकर्षत फिचर्स लेस आहे.