Samsung Galaxy M31 (Photo Credits: Samsung)

दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग ने काही दिवसांपूर्वी Galaxy M31 हा नवा फोन भारतीय बाजारात लॉन्च केला. या स्मार्टफोनचा आज पहिलावहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाईट Amazon India आणि सॅमसंगची अधिकृत वेबसाईट Samsung.com वर हा सेल सुरु होईल. या सेल अंतर्गत ग्राहकांना आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. तर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Samsung Galaxy M31 आज दुपारपासून ऑफरसह ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M31 हा स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. याच्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची किंमत 14,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. यात ओशियन ब्लू आणि स्पेस ब्लॅक हे दोन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. या सेलअंतर्गत ग्राहकांना काही खास ऑफर्स दिल्या जाणार आहेत. तसंच इंट्रोडक्टरी ऑफ म्हणून 1,000 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. तर काही ऑफर्संना व्हॅलिटीडी आहे. (Realme भारतात 5 मार्चला लॉन्च करणार दोन नवे स्मार्टफोन, कंपनीकडून खुलासा)

या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाच्या FHD+ AMOLED Infinity-U डिस्प्ले सह गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. तसंच हा फोन एक्सीनोस 9611 प्रोसेसरवर काम करतो. माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून युजर्संना इंटरनल स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येईल. हा फोन अॅनरॉईड 10 वर आधारीत One UI 2.0 वर काम करतो. तसंच फोनमध्ये 6000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यासोबतच फोनमध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेंसर 64 मेगापिक्सल, दुसरा 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि तिसरा 5 मेगापिक्सलचा तर चौथा 8 मेगापिक्सलचा अॅल्ट्रा वाईल्ड कॅमेरा सेंसर आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G/LTE, Wi-Fi, ब्लटूथ 5.0, GPS आणि USB Type-C पोर्ट यांसारखे फिचर्स आहेत.