Realme भारतात 5 मार्चला लॉन्च करणार दोन नवे स्मार्टफोन, कंपनीकडून खुलासा
Realme 6 (photo Credits-Twitter)

रियलमी (Ralme) कंपनी येत्या 5 मार्चला दोन नवे स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. तर रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी ट्वीट करत अभिनेता सलमान खान याचा फोटो शेअर केला होता. त्यामध्ये सलमानच्या हातात असलेला स्मार्टफोन रियलमीच्या 6 व्या सीरिजचा हिस्सा आहे. तर कंपनी Realme 6 आणि Realme 6 Pro लॉन्च करणार आहे. स्मार्टफोन लॉन्च करण्याची खास बाब म्हणजे यासाठी सलमान खान याला ब्रॅन्डअॅम्बेसेटर म्हणून निवडण्यात आले आहे.कंपनीच्य अधिकृत ट्वीटरुन एक पोस्टर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये कंपनीचा अपकमिंग स्मार्टफोन रियलमी 6 आणि रियलमी प्रो लॉन्च होण्याची तारीख झळकवण्यात आली आहे.

भारतात 5 मार्चला दुपारी 12.30 वाजता हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. अपकमिंग स्मार्टफोनमध्ये 64MP AI क्वाड कॅमेरा आणि प्रो डिस्प्ले सारखे फिचर्स देण्यात येणार आहेत. तसेच कंपनीचे हे नवे स्मार्टफोन फ्लिपकार्टवरुन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, यामध्ये 64mp चा प्रायमरी सेंसर असणार आहे.(Xiaomi Mi 10 आणि Mi 10 Pro लॉन्च, मिळणार तब्बल 108 मेगापिक्सल रिअर कॅमेरा; पाहा फिचर्स)

लिस्टिंगच्या नुसार, रिअलमी 6 प्रो मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह फुल एचडी+ डिस्प्ले दिला जाणार आहे. तसेच 30w फ्लॅश चार्ज फिचर्स असून फोन 15 मिनिटात 40 टक्के चार्ज होणार आहे. फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा सुद्धा असणार आहे. मात्र स्मार्टफोनबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.