Samsung Galaxy M21 2021 भारतात लॉन्च; 26 जुलै रोजी पहिला ऑनलाईन सेल
Samsung Galaxy M21 2021 Edition (Photo Credits: Samsung India)

साऊथ कोरियन स्मार्टफोन मेकर सॅमसंगचा गॅलेक्सी एम21 2021 (Samsung Galaxy M21 2021) एडिशन भारतीय बाजारात लॉन्च झाला आहे. या हँडसेटचा पहिला सेल 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरु होईल. अॅमेझॉन इंडियावरील (Amazon India) प्राईम डे सेल 2021 (Prime Day Sale 2021) अंतर्गत तुम्हाला याचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर सॅमसंग इंडिया (Samsung India) वेबसाईट आणि विविध ऑफलाईन रिटेल्स द्वारे हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. काही ठराविक बँक कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 1000 रुपयांचा कॅशबॅक दिला जाईल.

गॅलेक्सी एम21 2021 एडिशनमध्ये स्पोर्ट्स 6.4 इंच फुलएचडी+सुपर AMOLED Infinity-U display 2340x1080 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. यात octa-core Exynos 9611 SoC प्रोसेसर 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह देण्यात आला आहे. (Redmi Note 10 Pro Max वर धमाकेदार ऑफर, Amazon Prime Day 2021 मध्ये स्वस्तात खरेदी करण्याची संधी)

फोटोग्राफीसाठी यात ट्रिपर रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 48MP चा मेन कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईल्ड अॅंगल लेन्स आणि 5MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 20MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M21 2021 Edition (Photo Credits: Samsung India)
Samsung Galaxy M21 2021 Edition (Photo Credits: Samsung India)
Samsung Galaxy M21 2021 Edition (Photo Credits: Samsung India)

हा हँडसेट दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 4GB+64GB आणि 6GB+128GB. यात 6000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी यात Wi-Fi, Bluetooth, GPS/ A-GPS, USB Type-C, a 3.5mm headphone jack आणि 4G VoLTE देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम21 2021 एडिशनच्या  4GB + 64GB मॉडलची किंमत 12,499 रुपये असून 6GB + 128GB ची किंमत 14.999 रुपये इतकी आहे.