Amazon Prime Day 2021 ची सुरुवात येत्या 26 जुलै पासून सुरु होणार आहे. तर 27 तारखेपर्यंत सुरु राहणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी केल्यास 40 टक्क्यांपर्यंत सूटचा फायदा घेता येणार आहे. अॅमेझॉन प्राइम डे सेल 2021 मध्ये रेडमी नोट 10 प्रो मॅक्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. यासाठी अॅमेझॉनने HDFC बँकेसोबत सुद्धा टायअप केले आहे. रेडमी नोट 10 प्रो मॅक्स स्मार्टफोन अॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये 19,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या किंमती 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरियंटसाठी आहे. एचडीएफसी बँकेचे क्रेडिट/डेबिट कार्ड आणि EMI च्या माध्यमातून खरेदी केल्यास 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट ईएमआय सारखे ऑप्शन सुद्धा फोन खरेदीवर मिळणार आहेत. खरंतर या वेरियंटची किंमत 21,999 रुपये आहे.
रेडमीच्या या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. जो 108 मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह येणार आहे. हँडसेट मध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर मिळणार आहे.(Netflix युजर्ससाठी खुशखबर! स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच लॉन्च होणार Video Games)
रेडमी नोट 10 प्रो मॅक्समध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. जो 108 मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह येणार आहे. हँडसेटमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. हँडसेट मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 731G प्रोसेसर दिला आहे. रेडमी नोट10 प्रो मॅक्ससाठी 6.67 इंचाच फुलएचडी प्लस एमोलेड डॉट डिस्प्ले दिला आहे. स्क्रिनचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 असून HDR 10 सपोर्ट करणार आहे. स्मार्टफोनमध्ये 5020mAh ची बॅटरी दिली आहे. जी 33 वॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करणार आहे. ड्युअल सिम असणाऱ्या या फोनमध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅमसह 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज मध्ये खरेदी करता येणार आहे.