Netflix युजर्ससाठी खुशखबर! स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच लॉन्च होणार Video Games
Netflix plans to offer video games (Photo Credits: File Image)

नेटफ्लिक्स (Netflix) लवकरच व्हिडिओ गेम्स (Video Games) इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणार आहे. त्यामुळे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सवर आता व्हिडिओ गेम देखील सादर केले जाणार आहेत. नेटफ्लिक्स वरील व्हिडिओ गेम प्रोग्रॅमला प्रोत्साहन देण्यासाठी Sims, Plants vs Zombies आणि Star Wars यांसारख्या प्रसिद्ध गेम्सच्या निर्मितीमध्ये हातभार लावणारे फेसबुक एक्झिक्युटिव्ह Mike Verdu यांची नेटफ्लिक्सने नेमणूक केली आहे. ते नेटफ्लिक्स व्हिडिओ गेम डेव्हलपमेंटचे व्हाईस प्रेसिंडंट म्हणून काम करतील.

नेटफ्लिक्स पुढील वर्षभरात व्हिडिओ गेम्स सादर करण्यास सुरुवात करेल. परंतु, या गेम्सचा लाभ घेण्यासाठी युजर्संना अधिक पैसे भरण्याची गरज नसल्याचे Business Today च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या निर्णयामुळे नेटफ्लिक्सच्या प्रतिस्पर्धी असलेल्यांना मोठे आव्हान मिळाले आहे. टीव्ही शोज, डॉक्युमेंट्रीज, सिनेमे, वेबसिरीज यासोबतच नेटफ्लिक्स युजर्स आता व्हिडिओ गेम्सचा आस्वादही घेऊ शकतील. (Netflix ने लॉन्च केले ‘Play Something’ फिचर; युजर्सचा कल पाहून दाखवणार आवडीचे प्रोग्राम)

ग्लोबल व्हिडिओ गेम इंडस्ट्री मोठी असून त्यात वाढीला अधिक वाव आहे. Grand View Research च्या रिपोर्टनुसार, जागतिक गेम इंडस्ट्रीची मार्केट व्हॅल्यू 2019 मध्ये 151.06 बिलियन डॉलर इतकी होती आणि 2020-2027 पर्यंत दरवर्षी 12.9 टक्के यात वाढ होण्याची शक्यता आहे.

याशिवाय नेटफ्लिक्स Kid-Friendly Feature देखील लॉन्च करत आहे. अधिकृत बेवसाईटनुसार,  मुलांची आवड आणि त्यांना गुंतवणूक ठेवण्याचे नवे मार्ग याबाबत नेटफ्लिक्स पंधरवड्यातून एकदा मुलांच्या पालकांना इमेल करेल. यात कलरिंग शिट्स आणि अॅक्टीव्हीटीज मुलांच्या आवडीनुसार देण्यात येतील. त्याचबरोबर नेटफ्लिक्सचे हे नवे फिचर कसे वापरायचे, याच्या टिप्सही देण्यात येतील.