Samsung Galaxy M02s, Galaxy A12 आणि Galaxy F02s च्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नव्या किंमती
Samsung Galaxy F02s & Galaxy A12 (Photo Credits: Samsung)

सॅमसंग गॅलेक्सी एम02एस (Samsung Galaxy M02s), गॅलेक्सी ए12 (Galaxy A12) आणि गॅलेक्सी एफ02एस (Galaxy F02s) स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. हे सर्व स्मार्टफोन्सचे सर्व मॉडल्स 500 रुपयांनी महागले आहेत. यासंदर्भात सॅमसंगने (Samsung) कोणतेही ऑफिशियल स्टेटमेंट जारी केलेले नाही. मात्र सॅमसंगच्या इंडियन वेबसाईटवर नव्या किंमती (New Prices) दिसत आहेत. (Samsung Galaxy F22 स्मार्टफोन 'या' दिवशी होणार भारतात लॉन्च; जाणून घ्या काय असतील फिचर्स आणि किंमत)

गॅलेक्सी एम02एस चा 3जीबी+32जीबी वेरिएंट 8999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. मात्र आता किंमत वाढल्यानंतर हा स्मार्टफोन 9499 रुपयांना मिळत आहे. 4जीबी+64जीबी वेरिएंट 9,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन 10,499 रुपयांना मिळत आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए12 दोन वेरिेएंटमध्ये उपलब्ध आहेत- 4जीबी+64जीबी आणि 4जीबी+128जीबी. 4जीबी+64जीबी वेरिएंटची किंमत 12,999 रुपये इतकी होती. आता याची किंमत 13,499 रुपये इतकी झाली आहे. तर 4जीबी+128जीबी वेरिएंटची किमत 13,499 रुपये इतकी आहे. (Samsung घेऊन येणार भारतातील पहिला In-Display कॅमेरा फोन, पुढील महिन्यात होणार लॉन्च)

 

मोबाईल जुनी किंमत नवीन किंमत
Galaxy M02s (3GB + 32GB) 8,999 9,499
Galaxy M02s (4GB + 64GB) 9,999 10,499
Galaxy A12 (4GB + 64GB) 12,999 13,499
Galaxy A12 (4GB + 128GB) 13,999 14,499
Galaxy F02s (3GB + 32GB) 8,999 9,499
Galaxy F02s (4GB + 64GB) 9,999 10,499

गॅलेक्सी एफ02एस च्या 3जीबी+32जीबी मॉडल ची किंमत 8,999 रुपये आणि 4जीबी+64जीबी वेरिएंटची किंमत 9,999 रुपये इतकी आहे. या दोन्ही स्मार्टफोनची किंमत 9,499 आणि 10,499 रुपये इतकी आहे.