Samsung Galaxy F22 स्मार्टफोन 'या' दिवशी होणार भारतात लॉन्च; जाणून घ्या काय असतील फिचर्स आणि किंमत
Samsung Galaxy F22 (Photo Credits: Samsung Galaxy)

साऊथ कोरियन स्मार्टफोन कंपनी (South Korean Smartphone Maker) सॅमसंग (Samsung) आपला नवा स्मार्टफोन लवकरच भारतात ल़ॉन्च करणार आहे. गॅलेक्सी एफ22 (Galaxy F22) असे या स्मार्टफोनचे नाव असून 6 जुलै रोजी तो भारतीय बाजारात सादर करण्यात येईल. ई-कॉमर्स कंपनी 'फ्लिपकार्ट' (Flipkart) ने फोनची लॉन्च डेट (Launch Date) आणि इतर स्पेसिफिकेशन्सची (Specifications) माहिती दिली आहे. त्यानुसार, गॅलेक्सी एफ22 स्मार्टफोन 6 जून रोजी दुपारी 12 वाजता भारतात लॉन्च होईल आणि त्यानंतर विक्रीसाठी विविध ई-कॉमर्स कंपन्याच्या साईट्सवर उपलब्ध असेल.

या स्मार्टफोनची डिझाईन साधारणपणे गॅलेक्सी ए22 (Galaxy A22) प्रमाणेच आहे. गॅलेक्सी ए22 मागील आठवड्यात भारतात लॉन्च झाला आहे. फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, गॅलेक्सी एफ22 मध्ये 6.4 इंचाचा एचडी+AMOLED डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असून 48MP चा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. (Samsung Galaxy M32 भारतात लॉन्च; काय असतील स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमत? जाणून घ्या)

Samsung Galaxy F22 (Photo Credits: Samsung Galaxy)

Samsung Galaxy F22 (Photo Credits: Samsung Galaxy)

या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली असून MediaTek Helio G80 प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 4जीबी रॅम दिली असून अॅनरॉईड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन कार्यरत असेल. या स्मार्टफोनची किंमत 15,000 रुपये असेल, असे बोलले जात आहे.