Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन 29 सप्टेंबर रोजी होणार भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत
Samsung Galaxy F42 5G (Photo Credits: Samsung)

साऊथ कोरियन (South Korean) स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगने (Samsung) गॅलेक्सी एफ42 5जी (Galaxy F42 5G) स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. 29 सप्टेंबर रोजी हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होईल, अशी माहिती फ्लिपकार्टवर शेअर करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन्सचे काही स्पेसिफिकेशन्स (Specifications) देखील समोर आले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एफ42 हा नुकत्याच लॉन्च झालेल्या Galaxy Wide5 चे ebranded version आहे.

Galaxy F42 5G मध्ये 6.6 इंचाचा Super AMOLED डिस्प्ले 2400x1080 पिक्सल रिजोल्यूशन सह देण्यात आला आहे. यात 90Hz चा रिफ्रेश रेटही आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 5MP वाईल्ड एंगल लेन्स आणि 2MP चा डेप्थ शूटर देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ42 5जी मध्ये 5000mAh ची बॅटरी फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. (Samsung Galaxy F12 आणि Galaxy M12 च्या किंमतीत वाढ; काय आहेत New Prices? जाणून घ्या)

Samsung Galaxy F42 5G (Photo Credits: Samsung)
Samsung Galaxy F42 5G (Photo Credits: Samsung)

(हे ही वाचा: Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनच्या पहिल्या ऑनलाईन सेलला सुरुवात; 'या' साईट्सवरुन करु शकता खरेदी)

यात MediaTek Dimensity 700 SoC चा प्रोसेसर 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज सह देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये  8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. साऊथ कोरियामध्ये Galaxy F42 5G स्मार्टफोनच्या 6जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत KRW 4,49,900 इतकी आहे.