Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनचा पहिला ऑनलाईन सेल आजपासून सुरु; 'या' साईट्सवरुन करु शकता खरेदी
Samsung Galaxy M32 5G (Photo Credits: Samsung)

सॅमसंग गॅलेक्सी एम32 5 जी (Samsung Galaxy M32 5G) स्मार्टफोनचा पहिला ऑनलाईन सेल (Online Sale) भारतात आजपासून सुरु होत आहे. साऊथ कोरियन स्मार्टफोन मेकरने अलिकडेच हा स्मार्टपोन लॉन्च केला होता. आज दुपारी 12 वाजता अॅमेझॉन इंडिया (Amazon India), सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाईट (Samsung India website) आणि ऑफलाईन रिटेल स्टोअर्समध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध असेल. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड (ICICI Bank Credit Card) आणि क्रेडिट/डेबिट ईएमआय (Credit/Debit EMI) वरुन फोन खरेदी केल्यास 2000 रुपयांचा इस्टंट डिस्काऊंट मिळत आहे. (Samsung Galaxy S20 FE 5G: सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोन मिळतेय 40 हजारांपर्यंत सूट, पहा याची वैशिष्ट्ये)

Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+TFT Infinity-V डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे.  MediaTek Dimensity 720 SoC प्रोसेसर 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह देण्यात आला आहे.

यात क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप दिला असून 48MP मेन कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईल्ड शूटर आणि 5MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP मायक्रो स्नॅपर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M32 5G Smartphone (Photo Credits: Samsung)
Samsung Galaxy M32 5G (Photo Credits: Amazon India)

Galaxy M32 5G मध्ये 5000mAh ची बॅटरी 15W च्या फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. यात कनेक्टीव्हीटीसाठी यात 4G LTE, 5G, dual-band Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, USB Type-C port आणि 3.5mm ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. Samsung Galaxy M32 5G चा 6GB+128G वेरिएंट 20,999 रुपये आणि 8GB+128GB वेरिएंट 22,999 रुपयांना उपलब्ध आहे.