Samsung Galaxy F41 Launching in India Today: सॅमसंग गॅलेक्सी एफ 41 आज भारतात लॉन्च होणार, पाहा कसे असू शकतात फिचर्स?काय असेल किंमत?
Samsung Galaxy F41 | (Photo Credits: Samsung /Twitter)

Samsung Galaxy F41 भारतात आज (10 ऑक्टोबर) लॉन्च होत आहे. आज सायंकाळी 5.30 वाजता एका लाईव्ह इव्हेंटमध्ये हा फोन लॉन्च होईल. हा संपूर्ण इव्हेंट ऑनलाइन सॅमसंग इंडिया ( Samsung Galaxy F41 Launching in India) या सोशल अकाऊंट्सच्या माध्यमातून लाईव्ह दाखवला जाणार आहे. Samsung Galaxy F41 फोनची अधिकृत किंमत अद्याप समोर आली नाही. परंतू, सांगितले जात आहे की, हा फोन 15,000 रुपये ते 20,000 रुपये या दरम्यान मिळू शकेल. Samsung Galaxy F41 स्पेसिफिकेशन्स बाबत घ्या जाणून.

Samsung Galaxy F41 फोनच्या माध्यमातून सॅमसंग भारतात गॅलेक्सी एफ-सीरीज सुरु करत आहे. फोनच्या लॉन्चिंगपूर्वीच फोनचे काही प्रमुख स्पेसिफिकेशन्स टीज करण्यात आले आहेत. अर्थात, या फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स यांबाबत अद्यापही अधिकृतपणे विशेष काहीच पुढे आले नाही. परंतू, चर्चेच्या आधारावर प्रसारमाध्यमांतून या फोनविषयी बरीच माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार, सॅमसंग गॅलेक्सी एफ41 को 6,000mAh चा बॅटरी बॅकअपर हा या फोनचे वैशिष्ट्य सांगितले जात आहे. मोठी बॅटरी आणि सुपर एमोलेड इन्फिनिटी-यू डिस्प्ले यांसह हा फोन भारतात लॉन्च होत आहे. याशिवाय या फोनमध्ये Galaxy F41 में 64-मेगापिक्सल प्रायमरी सेंन्सरवाला ट्रिपल कॅमेरा सेटअपही असणार आहे. तसेच सॅमसंग गॅलेक्सी हा 6 जीबी रैम और एंड्रॉयड 10 सह लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन काळ्या, निळ्या आणि हिरव्या रंगात उपलब्ध असेल असा अंदाज आहे. (हेही वाचा, LG G8x ThinQ Smartphone: फ्लिपकार्ट च्या 'बिग बिलियन डेज सेल'मध्ये 70,000 रुपयांचा ड्यूल स्क्रीन स्मार्टफोन केवळ 19,999 रुपयांना खरेदी करता येणार; जाणून घ्या खास फिचर्स)

प्राप्त माहितीनुसार हा फोन Flipkart आणि Samsung च्या ऑनलाईन स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. फ्लिपकार्ट ने Galaxy F41 साठी एक विशेष पेजही तयार केले आहे. Samsung Galaxy F4 चे फिचर नुकतेच लिक झाले होते. त्यामध्ये म्हटले होते की, क्वाड रिअर कॅमेरा सेटअपपैकी 64 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर या फोनमध्ये असेल. याशिवाय फोनमद्ये Samsung चे सिंगल टेक फीचर दिले जाईल. फ्लिपकार्ट पेजवर असेही म्हटले आहे की, सॅमसंग गॅलेक्सी एफ41 मध्ये 6,000 एमएएच ची बॅटरी असेल. हे एक सूपर एमोलेड डिस्प्ले, इन्फीनिटी, यू डिजाईन आणि रिअर फिंगरप्र्ंट स्कॅनरसोबत असणार आहे.