LG G8x ThinQ Smartphone: फ्लिपकार्ट च्या 'बिग बिलियन डेज सेल'मध्ये 70,000 रुपयांचा ड्यूल स्क्रीन स्मार्टफोन केवळ 19,999 रुपयांना खरेदी करता येणार; जाणून घ्या खास फिचर्स
LG G8x ThinQ Smartphone (PC - LG.com)

LG G8x ThinQ Smartphone: ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आपल्या सेलच्या तारखा जाहीर केल्या आहेात. या सेलमध्ये ग्राहकांना बंपर ऑफर्स मिळणार आहेत. येत्या 16ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल' सुरु होत आहे. या सेलच्या खास ऑफर्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. स्मार्टफोनवर उपलब्ध असणाऱ्या ऑफर्सपैकी सर्वात जबरदस्त ऑफर्सची सध्या सर्वत्र सुरू आहे. ही ऑफर पाहून तुम्हीही आवाक व्हाल. कारण, या सेलमध्ये ग्राहकांना दोन डिस्प्ले असणाऱ्या LG G8x ThinQ स्मार्टफोनची खरेदी केवळ 19,999 रुपयांना करता येणार आहे. खरं तर या स्मार्टफोनची मूळ किंमत 70,000 रुपये इतकी आहे.

गेल्या वर्षी एलजीने लॉन्च केलेला LG G8x ThinQ हा सामान्य फोनसारखाचं आहे. परंतु त्याच्याशी संबंधित सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ड्युअल स्क्रीन अ‍ॅक्सेसरी. जी त्या स्मार्टफोनसोबत येते. या मदतीने फोनला ड्युअल स्क्रीन डिव्हाइसमध्ये रूपांतरित करता येते. म्हणजेच, वापरकर्ते एकाच वेळी दोन डिस्प्ले वापरू शकतात आणि हा स्मार्टफोन मल्टीटास्किंगसाठी सर्वोत्तम आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान या फोनवर ग्राहकांना सुमारे 70 टक्के सवलत देण्यात येणार आहे. (हेही वाचा - Teracube 2e Smartphone: 4 वर्षांच्या वॉरंटीसह खरेदी करू शकतो टेरॅक्यूब 2 ई स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)

फ्लिपकार्ट साइटवर 'क्रेझी डील्स' मध्ये एलजी जी 8 एक्स थिनक्यूवर मोठी सूट मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या फोनची मुळ किंमती 70,000 आहे. परंतु, हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 54,990 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. फ्लिपकार्टवरील विक्रीदरम्यान आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या फोनवर 35,000 रुपयांची सूट मिळेल. तसेच एसबीआय डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट केल्यास 10 टक्के अतिरिक्त सूट देखील मिळू शकेल आणि तुम्हाला हा फोन केवळ 17,991 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

दरम्यान, LG G8x ThinQ मध्ये 2340x1080 पिक्सल रिजोल्यूशनसह दोन 6.4 इंचाच्या OLED पूर्ण व्हिजन डिस्प्ले आहेत. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर आणि 6 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. फोनच्या रियर पॅनलवर 12 मेगापिक्सलचा स्टँडर्ड आणि 13 मेगापिक्सलचा सुपर वाइड लेन्स ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. याशिवाय फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरसह क्वॉलकॉम क्विक चार्ज 3.0 सपॉर्टसह 4,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.