Teracube 2e Smartphone: 4 वर्षांच्या वॉरंटीसह खरेदी करू शकतो टेरॅक्यूब 2 ई स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Android Smartphone (Photo Credit- flickr William Hook)

Teracube 2e Smartphone: आतापर्यंत तुम्ही बाजारात विविध स्मार्टफोन केवळ 1 वर्षाच्या वॉरंटीसह खरदी केले असतील. परंतु, आता बाजारात असा एक स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे, ज्याला 4 वर्षाची वॉरंटिटी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन टेरॅक्यूब नावाच्या अमेरिकन कंपनीने विकसित केला आहे. या स्मार्टफोनचे नाव टेरॅक्यूब 2 ई (Teracube 2e) आहे. या फोनची किंमत 99 डॉलर (सुमारे 7,200 रुपये) आहे. या फोनमध्ये नेमकं काय खास आहे हे जाणून घेऊयात.

दरम्यान, टेराक्यूब 2e हा अँड्रॉइड स्मार्टफोन असून तो रीसायकल मटेरियलपासून बनवण्यात आला आहे. या फोनमध्ये ग्लू ऐवजी पूर्णपणे स्क्रूचा वापर करण्यात आला आहे. चार वर्षांच्या वॉरंटीसह येणाऱ्या या फोनमध्ये बदलता येईल अशी बॅटरी आणि बायोडिग्रेडेबल केस देण्यात येत आहे.

Teracube 2e स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सविषयी बोलायचं झालं तर, या फोनमध्ये तुम्हाला वॉटरड्रॉप नॉचसह 6.1 इंचाचा एचडी + डिस्प्ले मिळणार आहे. याशिवाय 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह, या फोनमध्ये मीडियाटेक हेलियो ए 25 प्रोसेसर आहे. तसेच फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनच्या समोर 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. (हेही वाचा - WhatsApp Always Mute Feature: व्हॉट्सअॅपच्या अनावश्यक नोटिफिकेशनला मिळणार कायमची सुट्टी; 'हे' फिचर्स ठरणार उपयुक्त)

अगदी माफक दरात असलेल्या या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूनस रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. 4000mAh बॅटरीने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये फेस अनलॉक, ड्युअल सिम सपोर्ट आणि मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ब्लूटूथ 5.0, एनएफसी, ड्युअल बँड वाय-फाय आणि ऑडिओ जॅकसह यूएसबी टाइप-सी पोर्ट असे पर्याय देण्यात आले आहेत. (हेही वाचा - Poco C3 Smartphone: पोको सी 3 स्मार्टफोन आज होणार लाँच; 5000 बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमरा सेटअपयुक्त मोबाईल फ्लिपकार्टवर येणार खरेदी करता)

फोनच्या रिटेल बॉक्समध्ये आपल्याला चार्जर, इयरफोन आणि केबल्स मिळणार नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बहुतेक वापरकर्त्यांकडे आधीच या गोष्टी आहेत. तसेच छोट्या पॅकेजिंगमुळे शिपिंग दरम्यान कार्बन उत्सर्जन देखील 50 टक्क्यांपर्यंत कमी होते. इंडिगोगो पेजच्या सूचीनुसार या फोनचे पॅकेजिंग रिसायकल केलेल्या कागदापासून तयार केले गेले असून त्याच्या छपाईसाठी सोया शाई वापरण्यात आली आहे. ग्राहक सध्या हा स्मार्टफोन केवळ 99 डॉलर म्हणजेच सुमारे 7,200 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. सध्या या फोनची केवळ 8 युनिट शिल्लक आहेत. चार वर्षांच्या वॉरंटीसह हा फोन फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, पोलंड, सिंगापूर, स्पेन आणि यूकेमध्ये उपलब्ध आहे.