Poco C3 Smartphone: पोको सी 3 स्मार्टफोन आज होणार लाँच; 5000 बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमरा सेटअपयुक्त मोबाईल फ्लिपकार्टवर येणार खरेदी करता

पोकोचा नवीन स्मार्टफोन पोको सी 3 आज लाँच होणार आहे. 4 जीबी रॅम आणि तीन मागील कॅमेर्‍यांसह पोको सी 3 देखील रेडमी 9 सी (Redmi 9C) ची पुनर्ब्रांडेड आवृत्ती असल्याचे म्हटले जात आहे. या स्मार्टफोनचा लॉन्च इव्हेंट दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. ग्राहकांना हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. टीझरनुसार या फोनमध्ये एचडी + रेझोल्यूशन डिस्प्लेसह 5000mAh बॅटरी असणार आहे.

Poco C3 Smartphone: पोको सी 3 स्मार्टफोन आज होणार लाँच; 5000 बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमरा सेटअपयुक्त मोबाईल फ्लिपकार्टवर येणार खरेदी करता
Poco C3 Smartphone (photo credit - You Tube)

Poco C3 Smartphone: पोकोचा नवीन स्मार्टफोन पोको सी 3 आज लाँच होणार आहे. 4 जीबी रॅम आणि तीन मागील कॅमेर्‍यांसह पोको सी 3 देखील रेडमी 9 सी (Redmi 9C) ची पुनर्ब्रांडेड आवृत्ती असल्याचे म्हटले जात आहे. या स्मार्टफोनचा लॉन्च इव्हेंट दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. ग्राहकांना हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. टीझरनुसार या फोनमध्ये एचडी + रेझोल्यूशन डिस्प्लेसह 5000mAh बॅटरी असणार आहे.

या स्मार्टफोनचा लॉन्च इव्हेंट तुम्ही कंपनीच्या अधिकृत यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर पाहू शकता. याशिवाय यात दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही हा लाँच कार्यक्रम थेट पाहू शकता. प्राप्त माहितीनुसार, या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम व 64 जीबी इंटर्नल स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 10,990 रुपये असू शकते. मलेशियामध्ये लॉन्च झालेल्या रेडमी 9 सी (2 जीबी + 32 जीबी) ची किंमत सुमारे 7,500 रुपये होती. अशा परिस्थितीत, पोको सी 3 खरोखर रेडमी 9 सी चे रीब्रँडेड वर्जन असेल, तर त्यात याच स्मार्टफोनचे फीचर आणि स्पेसिफिकेशन्स मिळू शकतील. (हेही वाचा - Reliance Jio ने लाँच केला 1,499 रुपयांचा प्लान; ग्राहकांना मिळणार 300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल)

जर पोको सी 3 रेडमी 9 सी च्या रीब्रँडेड आवृत्ती म्हणून लाँच करण्यात आला तर यात 720x1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.53 इंच एचडी + एलसीडी पॅनेल दिले जाऊ शकते. हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलिओ जी 35 प्रोसेसरसह सुसज्ज असणार आहे. या फोनमध्ये कंपनी 512 जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्टसह रियर फिंगरप्रिंट सेन्सर देखील देऊ शकते. (वाचा - LG 'Wing' Smartphone: प्रसिद्ध एलजी कंपनी मंगळवारी लाँच करणार रोटेटिंग स्क्रीन स्मार्टफोन 'विंग'; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

दरम्यान, टीझरनुसार या फोनमध्ये वॉटरड्रॉप-स्टाईल नॉचसह एचडी + डिस्प्ले आहे. हा फोन 4 जीबी रॅमसह येईल, असे सांगितले जात आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 13 मेगापिक्सेलचे प्राथमिक लेन्स आहेत. फ्लिपकार्ट टीझर पेजनुसार, हा फोन 5000mAh बॅटरीसह मिळेल. रेडमी 9 सी प्रमाणेच यात 10 वॅट वेगवान चार्जिंगची सुविधादेखील मिळू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4 जी एलटीई, वायफाय, मायक्रो यूएसबी पोर्ट व्यतिरिक्त 3.5 मिमी हेडफोन जॅक मिळण्याची शक्यता आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2020 09:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).