Samsung Galaxy A12 (Photo Credits: Samsung India)

साऊथ कोरियन मोबाईल कंपनी सॅमसंग (Samsung) च्या गॅलेक्सी ए12  Galaxy A12) स्मार्टफोनचा फेब्रुवारीमध्ये सेल सुरु झाला होता. रशियामध्ये हा स्मार्टफोन गॅलेक्सी A12 Notched नावाने लॉन्च करण्यात आला. या स्मार्टफोनमध्ये आधी मीडियाटेकचा Helio P35 SoC प्रोसेसर देण्यात आला होता. परंतु, आता लॉन्च झालेल्या व्हर्जनमध्ये Exynos 850 Chipset प्रोसेसर देण्यात आला आहे. या मोबाईलमधील मुख्य आकर्षण म्हणजे क्वॉर्ड रिअर कॅमेरा, Nacho HD+ display, Exynos 850 SoC  प्रोसेसर आहे. आता हा स्मार्टफोन सॅमसंग इंडियाच्या (Samsung India) अधिकृत वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. (Samsung Galaxy M02s, Galaxy A12 आणि Galaxy F02s च्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नव्या किंमती)

हा स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे- 4GB+64GB आणि 6GB+128GB. या स्मार्टफोनची पूर्वीची किंमत 13,999 रुपये इतकी होती. तर 6GB+128GB ची किंमत 16,499 रुपये इतकी आहे. ओरिजनल गॅलेक्सी A12 देखील दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे-  4GB+64GB आणि 4GB+128GB. नंतर याची किंमत 14,999 रुपये इतकी करण्यात आली. हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध आहे- ब्लू, ब्लॅक आणि व्हाईट. सॅमसंग गॅलेक्सी या मोबाईलमध्ये 6.5 इंचाचा एचडी+PLS TFT डिस्प्ले 720x1,600 पिक्सल रिजोल्यूशन सह देण्यात आला आहे. याचा 20:9 इतका ऑस्पेक्ट रेशो आहे. यात octa-core Exynos 850 SoC प्रोसेसर  6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आला आहे. याची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.

Samsung Galaxy A12 (Photo Credits: Samsung India)
Samsung Galaxy A12 (Photo Credits: Samsung India)

फोटोग्राफीसाठी यात क्वार्ड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 48MP चा प्रायमरी सेन्सर आणि 5MP चा अल्ट्रा व्हाईड शूटर, 2MP चा डेप्थ सेन्सर  आणि 2MP चा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी यात 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5,000mAh बॅटरी 15W फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.