Samsung Electronics ही अग्रगण्य चीपमेकर कंपनी आहे. मात्र वाढत्या स्पर्धेमध्ये धावताना त्यांच्या कामगारांकडे दिलेले दुर्लक्ष अखेर त्यांना महागात पडलं आहे. मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टर आणि एलसीडी फॅक्टरीमध्ये (semiconductor and LCD factories) काम करणाऱ्या कर्मचाऱयांमध्ये काम करण्याची परिस्थिती आणि आरोग्याच्या समस्या यावरून वाद सुरु होते. मात्र आज अखेर कंपनीने हे मान्य केले आहे.
सॅमसंग कंपनीकडून माफीनामा जाहीर करताना co-president Kim Ki-nam यांनी सेमीकंडक्टर आणि एलसीडी फॅक्टरीमध्ये (semiconductor and LCD factories) आरोग्याचे धोके सांभाळताना हलगर्जीपणा झाल्याचे कबुल केले. तसेच यामुळे जितके कर्मचारी, संबंधित नातेवाईक यांचे नुकसान झाले त्यांची आम्ही माफी मागतो. असे सॅमसंग कडून सांगण्यात आले आहे. तसेच कॅन्सरमुळे जीव गमावणाऱ्याना 1.33 लाख डॉलर (95 लाख रुपये) नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
सॅमसंग कंपनीईच्या निष्काळजीपणामुळे १६ प्रकारचे विविध कॅन्सर (Cancer) ते गर्भपात (miscarriages ) आणि काही दुर्मिळ आजारांचा त्यामध्ये समावेश आहे. सुमारे 240 लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागला त्यापैकी 80 जण मृत पावले आहेत. मृतांमध्ये प्रामुख्याने तरुण स्त्रियांचा समावेश आहे. 2007साली रक्ताच्या कॅन्सरने पीडित तरुणीच्या कुटूंबियातील Hwang Sang-ki यांनी करारावर सही केली आहे. अखेर आमचा लढा यशस्वी ठरल्याच्या भावना व्यक्त केल्या. आम्ही माफीनामा स्वीकारत असलो तरीही यामुळे आमचं नुकसान भरून निघणार नाही. असेही त्या म्हणाला.
2007 सालापासून हे प्रकरण प्रकर्षाने पुढे आले आहे. Samsung Electronics’ Suwon chip plant मध्ये दोन महिन्यांपूर्वी एक भीषण अपघात झाला होता. यामध्ये carbon dioxide लीक झाल्याने २ सब कॉन्ट्रॅक्टर्सचा subcontractors नाहक बळी गेला.