प्रतिकात्मक फोटो | Photo Credits: You Tube)

रिव्होल्ट मोटर्स (Revolt Motors )भारतातील लोकप्रिय आरव्ही 400(RV 400) इलेक्ट्रिक बाइकचे(Electric Bike) बुकिंग पुन्हा सवलतीच्या दरात पुन्हा सुरू करणार आहे. अशी माहिती गुरूवारी रिव्होल्ट मोटर्स कंपनीने दिली. मागील विक्रीत, राहुल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील दुचाकी उत्पादकाला भरघोस प्रतिसादामुळे दोन तासांनंतर बुकिंग थांबवावे लागले. मात्र आता या कंपनीने या बाईकची विक्री करण्याचे ठरवले आहे.  आगामी बुकिंग सुरू झाल्याबरोबर कंपनीला प्रभावी विक्रीची अपेक्षा असणार त्यानुसार याची अधिकाधिक विक्री कशी होईल यावर कंपनीचे भर देईल.  मागील विक्रीत रेव्होल्ट मोटर्सने (Revolt Motors) 50 कोटी रुपयांची रिव्होल्ट आरव्ही 400 विकली असल्याची माहिती दिली. यानंतर आता पुन्हा एकदा कंपनीने आरव्ही 400 इलेक्ट्रिक बाईकची डिलिव्हरी सुरु केली आहे.

रिव्होल्ट आरव्ही 400 ची किंमत 

फेम इंडियाच्या हायब्रीड अँड इलेक्ट्रिक व्होकल्स इन इंडिया योजनेंतर्गत भारत सरकारने या कंपनीला सूट दिली आहे. यामुळे रिव्होल्ट मोटर्सने अलीकडेच बाईकची किंमत 28,000 रुपयांपर्यंत कमी केली आहे.  नवीन किंमतीत कपात केल्यामुळे रिव्होल्ट आरव्ही 400 आता 90,799 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. याआधी दिल्लीमध्ये त्याची शोरूम किंमत 1,18,999 रुपये इतकी होती. दरम्यान, अहमदाबादमध्ये आता ही बाईक 87,000 रुपयांवर विकली जात आहे.

रिव्होल्ट आरव्ही 400 ची  नोंदणी नेमकी कशी कराल ?

आपण आपली रिव्होल्ट आरव्ही 400 कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर  https://www.revoltmotors.com/ नोंदणी करू शकता. आपण पूर्व नोंदणी देखील करू शकता जेणेकरून इलेक्ट्रिक बाईक दुपारच्या वेळी सर्वांसाठी उघडण्यापूर्वी आपण बुक करू शकता. सध्या हरियाणातील मानेसर प्लांटमध्ये रिव्होल्ट मोटर्स आपल्या बाईकची निर्मिती करीत आहेत. ग्राहक त्यांच्या बाईकच्या डिलिव्हरीचा वारंवार पाठपुरावा करू शकतात.

15 जुलैला दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग पुन्हा सुरू होईल. मात्र सध्या आरव्ही 400 फक्त 6 शहरांमध्ये, दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये विकली जात आहे. खरेदीदार सकाळी 11 वाजल्यापासून नोंदणी करू शकतात.

रिव्होल्ट आरव्ही 400 वैशिष्ट्ये

रिव्होल्ट आरव्ही 400 हायस्पीड 85 किमी प्रतितास देते. या बाइक तीन प्रकारचे राइडिंग मोड आहेत. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन मोडमध्ये बाईक असेल. ईको मोड 45 किमी प्रती तासाचा वेग आणि 166 किमीची रेंज प्रदान करतो. सामान्य मोडमध्ये 65 किमी प्रतितास वेग आणि 110 किमीची रेंज मिळते. स्पोर्ट मोड 65 किमी प्रतितास वेग आणि 80 किमीची रेंज देते. तसेच आरव्ही 400 ची बॅटरी स्वॅप करण्यासाठी जवळचे रिव्होल्ट स्विच स्टेशन देखील शोधू शकता आणि 60 सेकंदांपेक्षा कमी वेळात पुढे जाऊ शकता. आरव्ही 400 एक 3 केडब्ल्यू मोटर पॅक करते.  ज्यामध्ये 72 व्ही, 3.24 केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरी यात असणार आहे.