Republic Day 2020 WhatsApp Stickers: प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर स्वतः बनवा देशभक्तीपर स्टिकर्स; जाणून घ्या प्रक्रिया
प्रजासत्ताक दिन (File Photo)

देशभरात आज 71 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जात आहे. या खास प्रसंगाला संस्मरणीय बनवण्यासाठी राजधानी दिल्लीसह, देशाच्या सर्व भागात भव्य सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी सर्व कार्यक्रमांना सुरुवात होईल. लोक इंटरनेटद्वारे, सोशल मिडियाद्वारे त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना शुभेच्छापर संदेश पाठवत आहेत. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व व्हिडिओ आणि संदेशांद्वारे एकमेकांशी शेअर केले जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) देखील प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांच्या स्टिकर्सचे (Stickers) भांडार उपलब्ध आहे.

प्रजासत्ताक दिनी आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी, आपल्याला अधिक आकर्षक स्टिकर पाहिजे असल्यास आपल्यासाठी प्रीमियर स्टिकर्स हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. व्हॉट्सअ‍ॅपवर आपण स्वतःही आपल्या कुटुंबियांना, मित्रांना आणि नातेवाईकांना अशा प्रकारे वेगवेगळी शुभेच्छा स्टिकर्स बनवून पाठवू शकता. यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स -

> सर्वप्रथम Google Play Store वर जा आणि कोणतेही स्टिकर मेकर अॅप इंस्टॉल करा. लक्षात ठेवा, काही स्टिकर बनवणारे अ‍ॅप्स व्हॉट्सअॅपच्या मानकांशी अनुकूल आहेत, मात्र काहींना अतिरिक्त अॅप इंस्टॉल करण्याची आवश्यकता भासू शकते.

> स्टिकर मेकिंग अॅप इंस्टॉल केल्यानंतर, ते उघडा आणि आपण जो फोटो जोडू इच्छिता त्या फोटोवर जा. आपण हा फोटो आपल्या फोनच्या गॅलरीमधून किंवा अ‍ॅपमधून घेऊ शकता.

> आपल्या फोटोचे बॅकग्राउंड काढून टाकायचे असल्यास, प्ले स्टोअरमधून बॅकग्राउंड इरेज टूल इंस्टॉल करा. याशिवाय स्टिकरमध्ये इमोजी, मजकूर आणि इतर गोष्टी घालायच्या असल्यास, फोटो सेव्ह करण्याआधी ती प्रक्रिया पूर्ण करा.

> आता, स्टिकर बनविणार्‍या अ‍ॅपवर परत जा आणि नवीन तयार केलेले स्टिकर जोडण्यासाठी '+' वर टॅप करा. (हेही वाचा: खास मराठी HD Greetings, Wallpapers, Whatsapp Status च्या माध्यमातून, वीर पुरूषांचे Quotes शेअर करून द्या प्रजासत्ताक दिन शुभेच्छा)

> यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करा आणि आपण तयार केलेले स्टिकर शोधण्यासाठी स्टिकर विभागात जा. येथून आपण आपल्या इच्छेनुसार ज्या लोकांना हवे त्यांना ते स्टिकर पाठवू शकता. स्टिकर सेक्शनमध्ये आपल्याला आधीपासून तयार केलेले बरेच स्टिकर्स पाहायला मिळतील.

दरम्यान, दिग्गज मेसेजिंग अॅपने जगातील वापरकर्त्यांसाठी प्रथम स्टिकर 2018 मध्ये लाँच केले. युजरचा प्लॅटफॉर्मवरील अनुभव अधिक रंजक करणे हा त्यामागील उद्देश होता. व्हॉट्सअ‍ॅपच्या ऑनलाइन स्टोअरवर सध्या असंख्य स्टिकर पॅक उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त आपण Google Play Store वरून आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक थर्ड पार्टे स्टिकर पॅक देखील इंस्टॉल करू शकता.