Republic Day (Photo Credits-File Image)

येत्या 26 जानेवारीला भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. कारण या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना अंमलात आणली होती. तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. खासकरुन सोशल मीडियावरील ट्वीटर प्लॅटफॉर्मवर प्रत्येक दिवसाला ट्रेण्ड होणाऱ्या मुद्द्यांबाबत हॅशटॅग झळकवले जातात. तर यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्वीटरवर #RepublicDayIndia, #RepublicDay,#RDay71 सारखे हॅशटॅग वापरुन एक खास इमोजी रोलआऊट करण्यात आला आहे.

INS यांनी ट्वीटर इंडिया यांच्या हवाल्याने माहिती देत असे म्हटले आहे की. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी  राष्ट्राचे नाव लिहिताना ट्वीटरवर प्रजासत्ताक दिन टॅग वापरला असता त्यांना तो इमोजी झळकवण्यात येणार आहे. त्यामुळे आता युजर्सने प्रजासत्ताक दिनासंबिधत हॅशटॅग वापरल्यास इंडिया गेट तिरंग्याने नटलेला इमोजी दिसून येणार आहे.(Republic Day 2020 Messages: प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश, Wishes, Greetings, Images, WhatsApp Status शेअर करून व्यक्त करा देशप्रेम!)

Tweet:

जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी इ.स. 1930 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून, पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. हा दिवस संपूर्ण देशात मोठ्या आनंदात साजरा केला जातो.तर दिल्ली येथे राजपथावरून एका मोठया परेडचे आयोजन करण्यात येते. भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे, रणगाडे समवेत संचलन करतात.