रिलायन्स जिओ (Reliance Jio) जिओबुक (JioBook) नावाच्या स्वस्त लॅपटॉपवर काम करत असल्याची माहिती मिळत आहे. असे म्हटले जात आहे की हा नवीन लॅपटॉप अँड्रॉइड वर आधारित, कस्टम स्किन वर आधारित असेल ज्याचे नाव JioOS असेल. हा Jio अॅप्ससह येऊ शकतो. जियोबुकला 4G LTE सपोर्ट असल्याचेही सांगितले जात आहे. 2018 च्या अहवालात म्हटले आहे की जिओ या क्षेत्रात काम करत आहे. याआधी या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने स्वस्त डेटा आणि परवडणार्या जिओफोनमुळे यापूर्वीच स्थानिक बाजारात नाव कमावले आहे.
एक्सडीएच्या अहवालात म्हटले आहे की, जिओने जिओबुक तयार करण्यासाठी चिनी कंपनी ब्लूबँक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (Bluebank Communication Technology) सह भागीदारी केली आहे. कंपनी आधीपासूनच आपल्या कारखान्यांमध्ये JioPhone तयार करीत आहे. एक्सडीए डेव्हलपर्सनी सांगितले की, जीओबुक मागील वर्षाच्या सप्टेंबरच्या सुरूवातीपासूनच विकसित करण्यात आला आहे आणि 2021 च्या उत्तरार्धात तो सादर करण्याची योजना आहे. या डिव्हाइसची उत्पादन प्रमाणीकरण चाचणी पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. जीओबुकच्या प्रोटोटाइपचा एक फोटोही शेअर केला गेला आहे. (हेही वाचा: Redmi Note 10, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत)
एक्सडीए डेव्हलपरच्या अहवालात म्हटले आहे की, जिओबुकच्या सध्याच्या प्रोटोटाइपमध्ये 1,366x768 पिक्सेल रिझोल्यूशनच्या डिस्प्लेसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 चिपसेट आणि एक स्नॅपड्रॅगन एक्स 12 4 जी मॉडेम समाविष्ट आहे. लॅपटॉपच्या बर्याच प्रकारांमध्ये चाचणी घेण्यात आली असून यापैकी एका मॉडेलमध्ये 2 जीबी LPDDR4x रॅम आणि 32 जीबी eMMC स्टोरेज आहे. आणखी एक मॉडेल आहे, ज्यामध्ये 4 जीबी LPDDR4x रॅम आणि 64 जीबी eMMC 5.1 स्टोरेजचा समावेश असल्याचे म्हटले जाते.