Redmi Note 10, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
Redmi Note 10 Pro Max (Photo Credits: Redmi India)

रेडमी इंडियाने रेडमी नोट 10 सिरीज भारतात लॉन्च केली आहे. रेडमी नोट 10, रेडमी नोट 10 प्रो आणि रेडमी नोट 10 प्रो मॅक्स या तीन स्मार्टफोन्सचा या सिरीजमध्ये समावेश आहे. रेडमी नोट 9 सिरीजच्या यशानंतर रेडमी नोट 10 सिरीज लॉन्च करण्यात आली आहे. रेडमी नोट 10 सिरीजमधील स्मार्टफोन्स Mi.com, Amazon India आणि इतर विक्रेत्यांकडे उपलब्ध असती्ल. रेडमी नोट 10 हा मोबाईल सेलसाठी 16 मार्चपासून उपलब्ध असेल. तर रेडमी 10 प्रो आणि रेडमी 10 प्रो मॅक्स हे विक्रीसाठी 17-18 मार्चपासून उपलब्ध होतील.

या स्मार्टफोन्समध्ये 6.6 इंचाचा सुपर AMOLED punch-hole डिस्प्ले दिला असून याचा 120Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 732G चिपसेट प्रोसेसर दिला असून 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल मेमरी सुद्धा दिली आहे. या स्मार्टफोन अॅनरॉईड 11 वर आधारीत MIUI 12 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या मोबाईलमध्ये 5,020mAh ची बॅटरी दिली असून हा मोबाईल तुम्हाला 33W फास्ट चार्जरसह मिळेल.

रेडमी नोट 10 प्रो मॅक्स मध्ये 108 MP, 5MP, 8MP आणि 2MP असा कॅमेरा दिला असून सेल्फी, व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा मोबाईल Vintage Bronze, Glacial Blue आणि Dark Night या तीन कलर शेडमध्ये उपलब्ध आहे.

रेडमी 10 प्रो मध्ये 64MP, 8MP, 5MP आणि 2MP असा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 5,020mAh ची बॅटरी दिली असून फोनसोबत तुम्हाला 33W चा फास्ट चार्जर सुद्धा मिळेल. हा फोन Aqua Green, Frost White and Shadow Black या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

रेडमी नोट 10 प्रो मॅक्सच्या 6 जीबी + 64 जीबी व्हेरिंएटची किंमत 18,999  रुपये असून 6 जीबी + 128 जीबी ची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. तर 8 जीबी + 128 जीबी ची किंमत 21,999 इतकी आहे. रेडमी नोट 10 प्रो च्या 6 जीबी + 64 जीबी वेरिएंटची किंमत 15,999 रुपये, 6 जीबी + 128 जीबी ची किंमत 16,999 तर 8 जीबी + 128 जीबी वेरिएंटची किंमत 18,999 रुपये इतकी आहे. रेडमी नोट 10 च्या 4 जीबी +64 जीबी वेरिएंटची किंमत 11,999 रुपये इतकी असून 6 जीबी + 128 जीबी ची किंमत 13,999 रु. इतकी आहे.