रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनीमध्ये जोरजार स्पर्धा सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार दोन्ही कंपन्या युजर्सला त्यांच्याकडे कशा प्रकारे आकर्षित करु शकतात यावर जास्त भर देत आहेत. त्यासाठी कंपन्या स्वस्त दरातील प्लॅन पण दमदार इंटरनेट स्पीड, कॉलिंग सुविधा यामध्ये युजर्सला देत आहेत. याच दरम्यान रिलायन्स जिओ यांच्या युजर्सला आता नेटवर्कशिवाय अन्य व्यक्तीला कॉलिंग करता येणार आहे. म्हणजेच जिओ कंपनीने त्यांच्या VoWiFi ची सुविधा ग्राहकांसाठी लॉन्च केली आहे. एअरटेलने त्यांची VoWiFi सर्विस डिसेंबर 2019 मध्ये लॉन्च केली होती.
एअरटेलच्या VoWiFi सर्विस फक्त एक्सट्रीम फायबरसह वापर करता येणार आहे. तर जिओ VoWiFi सर्विसची खासियत अशी आहे की, ही फक्त जिओ फायबर सर्विसपूर्ती मर्यादित नसून युजर्स याचा वापर इनडोर-वायफायसोबत पब्लिक वायफायसह हॉस्पॉटच्या माध्यमातून करु शकणार आहेत. एअरटेलची वॉईस ओवर वायफाय सर्विस दिल्लीसह मुंबई, कोलकाता, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू नंतर अन्य ठिकाणी सुद्धा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. दुसऱ्या बाजूला जिओ ही सर्विस सध्या दिल्ली आणि चेन्नई येथे उपलब्ध करुन दिली आहे.(Vodafone चा बेस्ट प्रीपेड प्लॅन 399 रुपयांपासून सुरु, जाणून घ्या युजर्सला कोणत्या सुविधा मिळणार)
जिओ कंपनी त्यांच्या युजर्ससाठी वाय-फाय सर्विसच्या माध्यमातून इंडोर कॉलिंग सुविधा अधिक उत्तम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही वेळेस मोबाईलचे नेटवर्क कमी असल्यास कॉलिंग करते वेळी अडथळा येतो. मात्र जिओ त्यांच्या युजर्सला याबाबत सुपर सुविधा देणार आहे. या सर्विसची अजून एक खासियत म्हणजे याचा वापर करण्यासाठी युजर्सला कोणतेही अॅप डाऊनलोड किंवा कोठेही लॉगिन करावे लागणा नाही. युजर्सला घरातील वायफाय कनेक्शनच्या माध्यमातून या सर्विसचा वापर करता येणार आहे.