Reliance Jio च्या ग्राहकांना झटका, आता टॉकटाइमच्या प्लॅनमध्ये मिळणार नाही डेटा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

रिलायन्स जिओ (Reliance Jio) युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. कारण आता कंपनीकडून टॉकटाइम प्लॅनसोबत दिला जाणारा डेटा बेनिफिट्सची सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिओच्या 4G वाउचर्स मध्ये वॉइस कॉलिंगचा फायदा मिळणार नाही आहे. 2020 च्या सुरुवातीलाच जिओ कंपनीने आपल्या टॉकटाइम प्लॅनसह 100GB पर्यंतचा फ्री वाउचर आणि 4G डेटा वाउचर्स सोबत नॉन-जिओ नेटवर्कवर 1000 पर्यंत कॉलिंग मिनिट्स दिले जाणार असल्याची घोषणा केली होती.

मुकेश अंबानी यांची जिओ कंपनी आतापर्यंत ऑफ-नेट कॉलवर 10 रुपये खर्च करणाऱ्या युजर्सला 1GB डेटा फ्री मध्ये देत होती. म्हणजेच 1 हजार रुपयांच्या टॉकटाइम प्लॅनसोबत 100GB डेटा फ्री मध्ये दिला जात होता. परंतु आता प्रत्येक नेटवर्कवर वॉइस कॉलिंग फ्री केली असून फ्री डेटा वाउचर सुविधा बंद करणे भाग आहे. (Reliance Jio 5G Launch 2021: मुकेश अंबानी यांची घोषणा,पुढच्या वर्षी रिलायन्स जिओ 5G सेवा लॉन्च करणार)

2020 च्या अखेरिस रिलायन्स जिओ ने घोषणा करत झिरो IUC सिस्टिम लागू झाल्यानंतर जिओ ग्राहकांना प्रत्येक नेटवर्कवर फ्री वॉइस कॉलिंग करता येणार असल्याचे म्हटले होते. तर ऑफ-नेट कॉलिंगसाठी जिओने आपल्या टॉक टाइम प्लॅनसोबत 6 पैसे प्रति मिनिट चार्ज वसूल करणे सुरु केले होते. यासाठी प्लॅनमध्ये युजर्सला अतिरिक्त डेटा ऑफर ही केला जात होता.

जिओकडे 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये आणि 1 हजार रुपयांपर्यंतचे टॉक टाइम प्लॅन्स आहेत. यामध्ये 100GB पर्यंत मोफत डेटा मिळतो. मात्र हे प्लॅन फक्त फ्री टॉक टाइमसह येतात. 1 हजार रुपयांचा प्लॅन मध्ये 844.46 रुपयांटा टॉक टाइम मिळतो. (Jio Best Recharge Plans: जिओ कंपनीचे 200 रुपयांहून कमी किंमतीतील 'या' धमाकेदार प्लॅन्सबद्दल येथे अधिक जाणून घ्या)