Jio च्या 98 रुपयांच्या धमाकेदार प्लॉनमध्ये युजर्सला महिनाभर करता येणार अनलिमिटेड कॉलिंग
Reliance Jio (Photo Credits: Facebook)

देशातील पहिल्या क्रमांकावर असलेली टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) यांनी त्यांचा एक धमाकेदार प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसोबत डेटा सुद्धा ऑफर केला जात आहे. यापूर्वी कंपनीने 129 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला होता. त्यामध्ये सुद्धा युजर्सला या सारखेच बेनिफिट्स देण्यात आले. मात्र आता नव्याने लॉन्च केलेल्या 89 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आता अन्य नेटवर्कवर सुद्धा करता येणार आहे. तर 200 रुपयांच्या खालील किंमती मधील प्रीपेड प्लॅनबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपन्या 149 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहेत. या नव्या जिओच्या प्रीपेड प्लॅनसह कंपनीकडे 200 रुपयांच्या खालील तीन प्रीपेड प्लॅन उपलब्ध आहेत.

जिओच्या 98 रुपयांच्या प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनसोबत युजर्सला जिओ-टू-जिओ अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. तसेच 2GB डेटा सुद्धा मिळणार आहे. अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी ऑफनेट कॉलिंगसाठी युजर्सला 129 मिनिट IUC मिनिट्स ऑफर करण्यात येणार आहेत. दरम्यान युजर्सला 10 रुपयांचा टॉप-अप प्लॅन खरेदी करावा लागणार आहे.(Paytm New Rule: Paytm Wallet संबंधित 'हे' नियम बदलणार)

तसेच जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनध्ये 24 दिवसांची वॅलिटिडी मिळणार असून युजर्सला ऑन-नेट कॉलिंगसाठी अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. तर ऑफनेट कॉलिंगसाठी 300 मिनिटे फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यामध्ये प्रतिदिन 1GB डेटा सुद्धा युजर्सला ऑफर केला जात आहे.