Paytm New Rule: भारतात डिजिटल पद्धतीने पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्या लोक पैसे देण्याघेण्याच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात Paytm चा वापर करतात. परंतु, आता 30 डिसेंबरपासून Paytm संबंधित काही नियम बदलणार आहेत. यापुढे तुम्हाला Paytm वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने पैसे टाकलेत तर त्यासाठी चार्जेस द्यावे लागणार आहेत.
पेटीऍमने दिलेल्या माहितीनुसार, Paytm वॉलेटमध्ये 10 हजार रुपये टाकले तर कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही. परंतु, त्यापेक्षा जास्त पैसे टाकल्यानंतर ग्राहकांना 1.7 टक्के चार्ज द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा जास्त म्हणजे 1 रुपयाही अॅड केला तरीदेखील तुम्हाला पूर्ण रकमेवर चार्ज द्यावा लागेल. (हेही वाचा - आंदोलन काळात इंटरनेट बंद ठेवल्याने प्रत्येक तासाला होते 'ऐवढ्या' रुपयांचे नुकसान!)
उदारणार्थ तुम्ही 12 हजार रुपये Paytm वॉलेटमध्ये टाकले, तर त्या पूर्ण रकमेवर 1.7 टक्के GST लागेल. 1.7 टक्के या हिशोबाने ग्राहकांना 240 रुपये जादा द्यावे लागतील. हे पैसे ग्राहकांच्या क्रेडिट कार्डमधून कापण्यात येतील. तसेच तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी रुपये Paytm वॉलेटमध्ये टाकले तर तुम्हाला कोणताही चार्ज देण्याची गरज नाही. वरील सर्व नियम Paytm वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डाने पैसे ट्रान्सफर केले तरच लागू असणार आहेत. विशेष म्हणजे डेबिट कार्डासाठी असा कोणताही नियम नाही.