Reliance Jio ने सादर केले '5' नवीन प्रीपेड प्लॅन्स; येथे पहा डिटेल्स
Reliance Jio (Photo Credits: Twitter/ Reliance Jio)

रिलायन्स जिओने (Reliance Jio) 5 नवे प्रीपेड प्लॅन्स (Prepaid Plans) सादर केले आहेत. यात डेटासह अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळणार आहे. एक्स्ट्रा डेटा मिळवण्यासाठी डेटा व्हाऊचर्स खरेदी करु इच्छित नसणाऱ्या आणि आणि कोणत्याही दिवशी अनलिमिडेट टेडा वापरु इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हे प्लॅन्स फायदेशीर ठरतील. या सर्व प्लॅन्समध्ये कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिडेट व्हाईस कॉलिंगची (Unlimited Voice Calling) सुविधा मिळत आहे. तसंच दिवसाला 100 एसएमएस (SMS) आणि जिओ अॅपचे (Jio Apps) फ्री अॅक्सेस मिळत आहे. यात JioTV, JioCinema, JioNews आणि इतर अॅप्सचा समावेश आहे. 127 रुपये, 247 रुपये, 447 रुपये, 597 रुपये आणि 2397 रुपये असे हे 5 प्लॅन्स आहेत. जाणून घेऊया त्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल...

127 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनमध्ये एकूण 12 जीबी डेटा दिला जात असून 15 दिवसांची व्हॅलिडीटी आहे.

247 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनमध्ये एकूण 25 जीबी डेटा दिला जात असून याची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे.

447 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनमध्ये एकूण 50 जीबी डेटा आणि 60 दिवसांची व्हॅलिडीटी देण्यात आली आहे.

597 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनमध्ये एकूण 75 जीबी डेटा आणि 90 दिवसांची व्हॅलिडीटी देण्यात आली आहे.

2,397 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनमध्ये 365 जीबी डेटा देण्यात आला आहे, हा वार्षिक प्लॅन असल्याने याची व्हॅलिडीटी 365 दिवसांची असेल.

(Reliance Jio चा नवा प्लॅन; 1999 रुपयांत मिळणार कॉलिंग, डेटा आणि फोन अगदी मोफत)

दिवसाला 2 जीबी किंवा 1.5 जीबी डेटा आणि 56 दिवसांची व्हॅलिटीडी हवी असणाऱ्या युजर्ससाठी 444 रुपये आणि 399 रुपयांचे जिओ प्लॅन्स देखील आहेत. या दोन्ही प्लॅन्समध्ये अनलिमिडेट कॉलिंग आणि दिवसाला 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.