
रिलायन्स जिओने (Relinace Jio) त्यांनी वेबसाइट नुकतीच रिडिझाइन केली आहे. त्याचसोबत कंपनीने आपल्या सर्वाधिक डिमांड असलेल्या रिचार्ज कॅटेगरीची सुद्धा विभागणी केली आहे. कंपनीने Super Value, Best Seller आणि Trending कॅटेगरीत रिचार्जची विभागणी केली आहे. सुपर वॅल्यू कॅटेगरीत तीन, बेस्ट सेलमध्ये दोन आणि ट्रेन्डिंगमध्ये एक रिचार्ज प्लानचा समावेश आहे. याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार असून जिओच्या 249 रुपयांच्या सुपर वॅल्यू पॅक संदर्भात अधिक माहिती देणार आहोत.
रिलायन्स जिओच्या 249 रुपयांच्या जिओ प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यामध्ये युजर्सला प्रतिदिन 2 जीबी हाय स्पीड डेटा ऑफर केला जाणार आहे. त्यानुसार ग्राहकांना एकूण 56 जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा घेता येणार आहे. परंतु प्रति दिन मिळणारा डेटा संपल्यास त्याची स्पीड कमी होऊन 64kbps होणार आहे.(Relaince Jio आणि Vi ने लाँच केला 401 रुपयांचा प्लान; दोन्हींच्या पॅकवर मिळेल Disney + Hotstar चं सब्सक्रिप्शन; जाणून घ्या कोणती योजना ठरेल फायदेशीर)
तसेच जिओच्या या प्लॅनमध्ये लोकल आणि एसटीडी वॉइस कॉलिंग अनिलिडेट आहे. त्याचसोबत 100 एसएमएस सुद्धा फ्री दिले जाणार आहेत. ग्राहकांना जिओच्या या प्लॅनमध्ये जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओन्यूज, जिओसिक्युरिटी आणि जिओक्लाउडची सुविधा फ्री मध्ये दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त कंपनीने 2599 रुपयांच्या प्लॅनला सुपर वॅल्यू प्लॅनमध्ये समावेश केला आहे.(रिलायन्स जिओचे नवे 'JioMeet' HD व्हिडिओ कॉन्फरसिंग अॅप लॉन्च, 100 जण एकाच वेळी होऊ शकतात सहभागी; जाणून घ्या कसा वापराल हा अॅप)
तर रिलायन्स जिओच्या 401 रुपयांच्या योजनेत Disney+ Hotstar ची 1 वर्षासाठी सदस्यता मिळते. या 28 दिवसांच्या योजनेत दररोज 3 जीबी डेटा + 6 जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण 90 जीबी डेटा देण्यात येतो. दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस व्यतिरिक्त, जिओ अॅप्सची विनामूल्य सदस्यता देखील उपलब्ध आहे.