Photo Credit: Flipkart

मोबाईल ही हल्ली जीवनावश्यक वस्तु झाली आहे. प्रत्येकाकडे अन्ड्रॉइड मोबाईल आहे. ऑनलाईन क्लासच्या निमित्ताने अगदी लहानग्यांपासून ते करमणुकीचे साधन म्हणुन वृध्दांपर्यत सगळ्यांकडे स्मार्ट फोन आहे. तरी स्मार्ट फोन खरेदीच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. स्मार्टफोनच्या विविध कंपनी फोनमध्ये नवनवीन फिचर लॉंच करताना दिसत आहे. पण नवीन फिचर आणि अपडेटसह स्मार्ट फोनच्या किमती गगनाला भिडताना दिसत आहेत. पण काही कंपन्यांचे अगदी सुपर मॉडेल तुम्हाला अगदी किफायती दरात खरेदी करता येणार आहे. तरी तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. अॅमेझॉनवर आजपासून Smartphone Upgrade Day Sale सुरू झाला असून या सेल दरम्यान स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर अनेक ऑफर्स उपलब्ध आहे. तरी अमेझोनच्या या सेलमध्ये तुम्हाला विविध कंपनीचे स्मार्टफोन अगदी किफायती दरात खरेदी करता येणार आहे.

 

अॅमेझॉनवर स्मार्टफोन अपग्रेड डे सेलला  आजपासून म्हणजे १० डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. तर १४ डिसेंबर पर्यत हा सेल असणार आहे. खरेदीदार एचडीएफसी क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट, १००० रुपयांपर्यंतच्या क्रेडिट कार्ड ईएमआयवर किमान ५००० च्या खरेदीवर मिळवू शकतात. याशिवाय, ग्राहक फेडरल बँक क्रेडिट कार्डवर ५००० रुपयांच्या किमान खरेदी मूल्यासह १२५० रुपयांपर्यंत सूट देखील मिळवू शकतात. (हे ही वाचा:- तुमच्या Smart Phone चा कॅमेरा आणि फ्लॅश वापरून तपासा रक्तातील Oxygen Level, जाणून घ्या, संशोधनाचा संपूर्ण अहवाल)

 

Amazon Smartphone अपग्रेड डेज सेलमध्ये OPPO F21s Pro 5G केवळ २४,४९९ रुपयांना उपलब्ध असेल. OPPO A76 आणि OPPO A77s अनुक्रमे १५४९० आणि १६९९९ रुपयांना उपलब्ध आहेत. तर Realme Narzo 50A Prime हा फोन सेलमध्ये ८९९९ रुपयांमध्ये सेलमध्ये उपलब्ध आहे. तर Realme Narzo 50i ५४९९ रुपयांना खरेदी करता येईल. तसेच रेडमी फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. कारण Redmi A1 ५५७९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. तसेच, तुम्ही Redmi 10A Rs ७६४९ रुपयांमध्ये, Redmi 11 Prime 5G Rs ११९९९ रुपयांमध्ये आणि Redmi Note 11 १०,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.