Redmi Note 9 आज होणार भारतात लाँच, स्मार्टफोनमध्ये असू शकतात 'ही' खास वैशिष्ट्ये
Xiaomi (photo Credit: IANS/Representative Image)

स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी आपले नवीन स्मार्टफोन आज भारतात लाँच करणार आहेत. Redmi Note 9 आणि Redmi Note 9 Pro हे दोन स्मार्टफोन्स आज दुपारी कंपनीच्या ऑनलाईन कार्यक्रमात लाँच होणार आहेत. या स्मार्टफोन्समध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. लाँचिंग आधीच US FCC वेबसाइटवर Redmi Note 9 pro चे खास वैशिष्ट्ये लिक झाले आहेत.हा रेडमी चा नोट सीरिजमधील पुढील व्हर्जन आहे. भारतात याआधीच्या रेडमी नोट 8 ला भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सर्वांचे या नवीन स्मार्टफोनकडे लक्ष लागले आहे.

रेडमी नोट 9 प्रो हा स्मार्टफोन अँड्रॉईड 10 वर आधारित MIUI 11 वर असू शकतो. याआधी गीकबेंच लिस्टिंगमध्येही या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर दाखवण्यात आले होते. Redmi 8 येत्या 9 ऑक्टोंबरला भारतात होणार लॉन्च, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स

या स्मार्टफोनमध्ये 4920mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असण्याची शक्यता आहे. रेडमी नोट सीरिज स्मार्टफोनमधील आता पर्यंत देण्यात आलेली सर्वात जास्त बॅटरी आहे. रेडमी नोट ९ प्रो मध्ये ३० वॅट फास्ट चार्जिंग आणि Wi-Fi 802.11b/g/n सपोर्ट करणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे.

याचे फिचर्स पाहता रेडमी नोट 9 सीरिजच्या स्मार्टफोनची किंमत 9999 रुपये असू शकते. ही किंमत रेडमी नोट 9 ची मूळ किंमत असणार आहे. रेडमी नोट 9 मध्ये क्वॉड रियर कॅमे-याचा सेटअप देखील मिळणार आहे.

रेडमी नोट 9 प्रो चे आधीचे व्हर्जन रेडमी नोट 8 प्रो मध्ये 64MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 8MP चा वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 20MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 6.53 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.