Redmi Note 7S स्मार्टफोन लॉन्च, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स
Redmi Note 7S (Photo Credits-Twitter)

रेडमी नोट 7एस (Redmi Note 7S) लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, Mi.com आणि Mi Home येथे सेलसाठी येत्या 23 मे रोजी उपलब्ध होणार आहे. रेडमी नोट 7एस स्मार्टफोनची सुरुवाती किंमत फक्त 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

तर स्मार्टफोनमध्ये 6.2 इंच Full HD+ डिस्प्ले, ओक्टा-कोर-स्नॅपड्रॅगन 660 SoC 4000mAh ची सुपर पावर बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये 48MP प्रायमरी सेंसरसह ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमी नोट 7एस चे स्पेसिफिकेशन हे रेडमी नोट 7 सारखेच आहे.(Redmi Note 7S लवकरच होणार लॉन्च, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स)

रेडमी नोट 7एस 3GB RAM+32GB Storage असणाऱ्या वेरिंएटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच Onyx Black, Ruby Red आणि Sapphire Blue कलरमध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.