Flipkart Big Billion Days 2023: स्वस्तात फोन खरेदी करायच? तर फ्लिपकार्डचा बिग बिलियन डेज सेल वरून खरेदी करा हे बेस्ट स्मार्टफोन
Flipkart Big Billion Days Sale | (Photo credit: archived, edited, representative image)

Flipkart Big Billion Days 2023: सणासुदीच्या वेळी फ्लिपकार्डचा बिग बिलियन डेज सेल सुरु झाला आहे.8 ऑक्टोबरपासून हा सेल चालू झाला आहे. या सेल मध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक उत्पादने आहे ज्यावर आकर्षक ऑफर्स आहेत. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज 2023 च्या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सवर 80 टक्के सूट मिळणार आहे. लॅपटॉपवर अनेक ऑफर्स मिळणार आहे. तर कीबोर्डची किंमत 99 रुपये असणार आहे. तर या सेल मध्ये तुम्हाच्या आवडीच्या ब्रॅंडने सवलती जारी केल्या आहेत. हे स्मार्टफोन तुम्ही 25 हजारांपेक्षाही कमी किमतीत खरेदी करू शकता.

Redmi Note 12 Peo 5G 

रेडमीने नुकतचं नोट 12 सिरिज लॉन्च केले आहे. या फोन मध्ये मिडियाटेक डायमेन्सिटी 1070 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. रेडमी नोट प्रो मध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी आणि 68 W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील मिळतो

Motorola Edge 40

फोनच्या दोन्ही बाजूस 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक ड्युअल कॅमेरा असणार आहे. 6.55 इंचाचा P-OLED डिस्प्ले मिळतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा 144  Hz इतका असणार आहे.  34,000 च्या किमतीच्या फोनची किमत फ्लिपकार्डच्या बिग डिल सेलवर 25,000 पर्यंत मिळेल.

Vivo V29e

विव्हो व्ही 29 ई हा फोन सेल्फी कॅमेरा चांगला असणाऱ्यांपैकी आहे. या फोनमध्ये 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा 120 Hz इतका आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी देखील 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.या फोन मध्ये दोन वेगवेगळे कलर्स उपलब्ध आहे.स्पॅनड्रागन 695  प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे.

OnePlus Nord CE 3 Lite 5G

वन प्लस कंपनीने देखील या सेलमध्ये एका नवीन लॉन्च झालेल्या फोनवर ऑफर्स लावली आहे. तुमाला बजेट फ्रेंडली स्मार्टफोन घ्यायचा असेल तर हा फोन खरेदी करू शकता. भन्नाट फीचर्स घेवून येणारा हा फोन 35 हजाराहून कमी किमतीला आहे.6.72 इंचचा डिसप्ले आहे. 5000mAh बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे.