Xiaomi ने अलीकडेच चीनमध्ये Redmi Note 11 मालिका लॉन्च केली आहे. त्याच वेळी, भारतात Redmi Note 11 मालिका लॉन्च होण्याची प्रतीक्षा आहे. पण लॉन्च होण्याआधीच Redmi Note 11 सीरीजबद्दल बरीच क्रेझ पाहायला मिळत आहे. जर आपण चीनबद्दल बोललो तर, Redmi Note 11 सीरीजचा स्मार्टफोन तिथे पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. Redmi Note 11 सीरिजच्या स्मार्टफोनने पहिल्या सेलमध्ये रेकॉर्ड विक्री केली आहे. Gsmarena च्या रिपोर्टनुसार, फक्त 1 तासात 1 मिलियन पेक्षा जास्त Redmi Note 11 सीरीज स्मार्टफोन विकले गेले आहेत. तथापि, Xiaomi कडून Redmi ब्रँड स्मार्टफोनची पुढील विक्री कधी सुरू होईल. याबाबत सध्या कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
Redmi Note 11 सीरीज अंतर्गत, Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ हे तीन उत्कृष्ट स्मार्टफोन सादर केले गेले आहेत. Redmi Note 11 स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 1,199 युआन (सुमारे 23,320 रुपये) आहे. फोन डायमेंसिटी 810 चिपसेट आणि 33W फास्ट चार्जिंग सह सादर करण्यात आला आहे.(Redmi स्मार्ट बँन्ड प्रो आणि रेडमी Watch 2 Lite स्मार्टवॉच लॉन्च, जाणून घ्या फिचर्सबद्दल अधिक)
Redmi Note 11 मालिकेत 6.6-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. Redmi Note 11 Pro वेरिएंट शक्तिशाली Dimensity 920 SoC चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. Redmi Note 11 5G ला 50MP कॅमेरा मिळेल, तर त्याचे अपग्रेड केलेले मॉडेल म्हणजे Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro Plus मध्ये 108MP कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जे 33W फास्ट चार्जिंगने सुसज्ज आहे.