Redmi Go स्मार्टफोनच्या खरेदीसाठी गुरुवारी (28 मार्च) दुपारी 2 वाजता सेल सुरु होणार आहे. रेडमीचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट (Flipkart), एमआय डॉट कॉम (Mi.Com) आणि एमआय होम (Mi Home) येथून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. मार्च महिन्यात कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केला असून आज पाचव्या सेलसाठी सुरुवात होणार आहे.
रेडमी गो स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना फक्त 4,999 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच ब्लॅक आणि ब्लू रंगामध्ये या स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रेडमीच्या
या स्मार्टफोनसाठी सेल आज दुपार पासून सुरु होणार असून 2,200 रुपयांचा जियो कॅशबॅक आणि 100 जीबी जियो डेटा फ्री मिळणार आहे. तसेच फ्लिपकार्टवरुन जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 5 टक्के या स्मार्टफोनवरु सूट देण्यात येणार आहे.(हेही वाचा-Redmi Go स्मार्टफोन लॉन्च, किंमत 4500 रुपयांपेक्षा कमी)
या स्मार्टफोनसाठी डुअल सिमकार्ड देण्यात आले असून अँन्ड्रॉइड 8.1 ओरियोवर काम करतो. 5 इंचाचा एचडी डिस्प्ले आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर देण्यात आला आहे. रेडमी गो स्मार्टफोनमध्ये 1GB RAM आणि 8GB स्टोरेज दिला आहे. तर स्मार्टफोनमधील स्टोरेज 128 GB पर्यंत वाढवण्याची सुविधा कंपनीकडून देण्यात आली आहे.