Redmi Go स्मार्टफोन लॉन्च, किंमत 4500 रुपयांपेक्षा कमी
Redmi Go Launched (Photo Credits-Twitter)

Xiaomi कंपनीने आज भारतात त्यांचा Redmi Go स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने ट्वीट करत असे म्हटले आहे की, या कार्यक्रमात तीन सरप्राईज असणार आहेत. तर रेडमी गो स्मार्टफोनने या वर्षीच्या सुरुवातीला झळकला होता. रेडमीचा हा स्मार्टफोन फिलीपिंन्स येथे उपलब्ध आहे. तसेच भारतात कंपनीने या स्मार्टफोनसाठी तुमचे नवीन जग असे नाव ठेवले आहे. थोड्याच वेळात हा स्मार्टफोन भारतात ही उपलब्ध होणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5 इंच एचडी डिस्प्लेस क्वॉलकॉम, स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर, 1GB RAM आणि 8GB स्टोरेज दिला आहे. रेडमीचा हा स्मार्टफोन अँन्ड्रॉइड ओरियोवर काम करतो. भारतात हिंदी गुगल असिस्टंडसोबत लॉन्च करण्यात आला आहे. फिलिपिंन्स येथे या स्मार्टफोनची किंमत 3,990 रुपये ठेवण्यात आली आहे.(हेही वाचा-Xiaomi Redmi 7 लॉन्च, सुपर फिचर्ससह कमी किंमतीत आजच खरेदी करा)

Mi India ट्वीट:

कंपनीने या स्मार्टफोनसाठी डिजिटल पेमेंट्स सुरु केले आहे. तर Mi Pay सेवा सुरु केली आहे. या अॅपमध्ये युपीआय पद्धतीने पैसे भरता येणार आहे. त्यामुळे या माध्यमातून कंपनीने डिजिटल पेमेंट सेवेमध्ये सुद्धा एन्ट्री घेतली आहे. रेडमी गो स्मार्टफोनची विक्री 22 मार्च पासून फ्लिपकार्ट, एमआय डॉट कॉम आणि एमआय स्टोर वरुन होणार आहे. तसेच स्मार्टफोनवर 2200 रुपयांची जिओची कॅशबॅक ऑफर ग्राहकांना मिळणार आहे.