Flipkart वर आज दुपारी 12 वाजता Realme Narzo 10 चा सेल, गेमिंग फिचरसह जबरदस्त बॅटरी लाईफ असलेल्या स्मार्टफोनची 'ही' आहे किंमत
Realme Narzo 10A Smartphone (Photo Credits: Realme India)

स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी ने Realme Narzo 10 स्मार्टफोनचा आज फ्लिपकार्टवर (Flipkart) सेल ठेवला आहे. आज दुपारी 12 वाजता हा सेल सुरु होणार असून फ्लिपकार्टसह रियलमीची अधिकृत साइट Realme.com वर पुन्हा एक फ्लॅशलसेलमध्ये याची विक्री होईल. जबरदस्त गेमिंग फिचर्स (Gaming Feature), उत्कृष्ट बॅटरी लाईफ (Battery Life) आणि कॅमेरा (Camera) ही या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे तुमच्या गेममध्ये व्यत्यय न येता त्याचा दीर्घकाळ आनंद घ्यायचा असेल तर हा उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. हा फोन तुम्ही नो कॉस्ट EMI वर खरेदी करु शकता. Realme Narzo 10 च्या खरेदीवर Flipkart Axis Bank Credit Card, Axis Bank Buzz Credit Card धारकांनां 5% डिस्काउंट मिळत आहे. त्यासोबतच यावर 6 महिन्याचे युट्यूब प्रीमियरचे मोफत सब्सक्रिप्शन मिळत आहे. फोनमध्ये 1334 रुपयांवर नो कॉस्ट EMI खरेदी करु शकता.

Realme Narzo 10 डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले 89.8 टक्के स्क्रिन टू बॉडी रेशियोसह देण्यात आला आहे. स्मार्टफोनसाठी वॉटरड्रॉप स्टाइल नॉच ही दिला असून दममदार परफॉर्मससाठी MediaTek Helio G80 चिपसेटसह येणार आहे. Realme Narzo 10 स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. गेमिंगसाठी हा दमदार ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 10 वर चालेल. यात ऑक्टाकोर मिडियाटेक हेलिओ G80 प्रोसेसर मिळतो. Vodafone Idea ने लॉन्च केला 351 रुपयांचा नवा Work From Home प्लॅन, युजर्सला 100GB डेटाचा घेता येणार लाभ

या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि प्रायमरी सेंसर व्यतिरिक्त यामध्ये 119 डिग्री अल्ट्रा-वाइड लेंसर, पोट्रेट लेंस आणि मॅक्रो लेंस देण्यात आल्या आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. त्यासोबतच यात 5000mAh ची बॅटरी चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.