Realme C2 स्मार्टफोनसाठी भारतात आज सेल, ग्राहकांना 5,999 रुपयांपासून खरेदी करता येणार
Realme C2 (Photo Credits-Twitter)

Realme C2 स्मार्टफोनसाठी भारतात आजपासून 12 वाजता सेल सुरु होणार आहे. रेलमीचा हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्ट किंवा रेलमीच्या बेवसाईटवरुन खरेदी करता येणार आहे. तर डायमंड ब्लू आणि डायमंड ब्लॅक कलरमध्ये हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करु शकता. तसेच EMI आणि बँक डिस्काउंट सुद्धा ग्राहकांना दिले जाणार आहे. रेलमी सी2 या स्मार्टफोनची खरेदी फक्त 5,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.

रेलमी सी2 स्मार्टफोनसाठी 2GB RAM आणि 16GB स्टोरेजची किंमत 5,999 रुपये आहे. तर 3GB RAM आणि 32GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनसाठी 7,999 रुपये आहे. ऑफर्स बद्दल बोलायचे झाल्यास फ्लिपकार्ट 1000 रुपये प्रति महिना किंमतीवर नो-कॉस्ट EMI हे ऑप्शन मिळणार आहे. तसेच एक्सिस बँक क्रेडिट कार्ड होल्डर्ससाठी 200 रुपयापर्यंत 5 टक्के सूट मिळणार आहे.(Redmi Note 7S स्मार्टफोन लॉन्च, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स)

या स्मार्टफोन 9 पाई बेस्ट ColorOS 6.0 वर कार्य करतो. त्यामध्ये गोरिला ग्ला, 3 प्रोटेक्शन आणि 19.5:9 रेश्योसह 6.1 इंच HD डिस्प्ले देण्यात आले आहे. तर 4,000mAH सुपर पावर बॅटरीसुद्धा देण्यात आली आहे.