Realme 9 स्मार्टफोन सीरिजच्या लॉन्चिंगची घोषणा, जाणून घ्या संभाव्य किंमतीसह स्पेसिफिकेशन
Realme (Photo Credit: Twitter)

रिलअमीची बहुचर्चित सीरिज Realme 9 च्या लॉन्चिंग बद्दल गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आता कंपनीने ही सीरिज लॉन्चिंग करण्याची घोषणा केली आहे. लीक्स रिपोर्टनुसार, सीरिजच्या फ्लॅगशिप डिवाइस रिअलमी 9 मध्ये दमदार कॅमेरा, पॉवरफुल प्रोसेसर आणि एचडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो.(WhatsApp चॅट्स iPhone मधून Samsung फोनमध्ये कसे ट्रान्सफर कराल? जाणून घ्या iOS मधून Android Mobiles मध्ये बॅकअप घेण्याची पद्धत)

Realme च्या Francis Wong यांनी ट्विट करत लिहिले की, कंपनी प्रत्येक वर्षी प्रो सीरिजचे दोन स्मार्टफोन उतरवते. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात आणि पुढील सहा महिन्यात स्मार्टफोन लॉन्च केले जातात. कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला रियअलमी 8 सीरिज उतरवली होती. त्यानंतर आता 9 सीरिज सप्टेंबर मध्ये दोन डिवाइससह लॉन्च करणार आहे. या व्यतिरिक्त कंपनी सीरिज 9 लॉन्च करण्याची तयारी सुद्धा करत आहे.

लीक रिपोर्ट्सनुसार, Realme 9 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. या डिवाइसमध्ये MediaTek Helio G95 चिपसेट, 6GB रॅम आणि 64GB चा इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. तसेच फोनमध्ये 64MP चा क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. हे डिवाइस अॅन्ड्रॉइड 11 वर आधारित Realme UI 2.0 वर काम करणार आहे.

कंपनीकडून स्मार्टफोनच्या लॉन्चिंग तारखेसह किंमतीबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र असा अंदाज लावला जात आहे की, स्मार्टफोनची किंमत 30-40 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते.(Reliance Jio च्या 'या' प्लॅन्स सोबत जिओफोन मिळेल मोफत)

तर रिअलमीचा 9 सप्टेंबरला Realme 8s 5G स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आणि 6.5 इंचाची स्क्रिन दिली जाऊ शकते. या व्यतिरिक्त डिवाइसमध्ये Android 11 ऑपरेटिंग सिस्टिमचा सपोर्ट मिळणार आहे. परंतु अद्याप स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यासह बॅटरी बद्दल माहिती देण्यात आलेली नाही. या स्मार्टफोनची किंमत 20-25 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते.