Reliance Jio च्या 'या' प्लॅन्स सोबत जिओफोन मिळेल मोफत
Reliance Jio (Photo Credits: Twitter)

रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या जिओफोन (JioPhone) ग्राहकांसाठी काही खास प्लॅन्स सुरु केले आहेत. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना भरगोस डेटा (Data), अनलिमिडेट कॉलिंग (Unlimited Calling) आणि जिओफोन देखील मिळेल. या ऑफर्संना 'जिओफोन 2021 ऑफर' (JioPhone 2021 Offer) म्हणून ओळखले जात आहे. जिओचे आधीपासून असलेले ग्राहक आणि नवीन ग्राहक देखील या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. (Reliance Jio चे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे खास प्लॅन्स; पहा काय आहेत ऑफर्स)

जिओफोन 1999 रुपयांचा प्लॅन:

जिओफोन 1999 रुपयांचा प्लॅन हा जिओच्या नव्या ग्राहकांसाठी आहे. या प्लॅनअंतर्गत ग्राहकांना 2 वर्षांपर्यंत व्हॅलिडीटी मिळणार आहे. तसेच दर महिन्याला 2जीबी डेटा आणि अनलिमिडेट व्हाईस कॉल्स मिळतील. मात्र डेटा संपल्यानंतर युजर्संना 64kbps इंटरनेट स्पीड मिळेल. खास आकर्षक म्हणजे या रिचार्ज मध्ये तुम्हाला नवा जिओफोन देखील मिळेल.

जिओफोन 1499 रुपयांचा प्लॅन:

जिओफोन 1499 रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला नवा जिओफोन मिळत असून त्यासोबत वर्षभराची व्हॅलिडीटी मिळत आहे. या प्लॅनअंतर्गत युजरला दर महिन्याला 2जीबी इंटरनेट डेटा आणि अनलिमिडेट व्हाईस कॉलिंग मिळणार आहे. मात्र डेटा संपल्यानंतर युजर्संना 64kbps इंटरनेट स्पीड मिळेल.

जिओफोन 749 रुपयांचा प्लॅन:

हा रिचार्ज प्लॅन जिओफोनच्या आधीपासून असलेल्या ग्राहकांसाठी खू सोयीस्कर आहे. या रिचार्जमध्ये युजर्संना संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडीटी मिळणार आहे. यासोबतच अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंग आणि दर महिन्याला 2 जीबी इंटरनेट डेटा सुद्धा मिळणार आहे. डेटा संपल्यानंतर मात्र युजर्संना 64kbps इंटरनेट स्पीड मिळेल.

देशभरातील टेलिकॉम कंपन्या दरवेळेस नवनवी प्लॅन्स सादर करुन ग्राहकांना आकर्षित करत असतात. रिलायन्स जिओ देखील सातत्याने नव्या प्लॅन्सची पर्वणी घेऊन येत असतं. आता जिओफोनच्या भन्नाट ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत.