Realme 8i स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन
Realme 8i (Photo Credits-Twitter)

Realme 8i भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनचे डिझाइन कंपनीने अत्यंत आकर्षक दिले आहे. या डिवाइसमध्ये पंच होल डिस्प्ले दिला गेला असून युजर्सला नव्या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी ही दिली जाणार आहे. त्याचसोबत 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा मिळणार आहे. तर जाणून घ्या Realme 8i स्मार्टफोनच्या किंमतसह स्पेसिफिकेशन बद्दल अधिक माहिती.(Oppo आणि Nokia ने एकमेकांच्या विरोधात दाखल केला खटला, जाणून घ्या यामागील कारण)

रिअलमी 8आय हा स्मार्टफोन लेटेस्ट Android 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे यामध्ये 6.6 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेजॉल्यूशन 2412X1080 पिक्सल, रिफ्रेश रेट 120HZ आणि टच सॅमपलिंग रेट 180Hz आहे. या स्मार्टफोनसाठी ऑक्टा कोर MediaTek Helio G96 प्रोसेसर दिला गेला आहे. याचा इंटरनल स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवला जाऊ शकतो.

Tweet:

Realme 8i स्मार्टफोनमध्ये उत्तम फोटोग्राफीसाठी कंपनीने ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. यातील पहिला सेन्सर 50MP आहे. इतर सेन्सर म्हणून त्यात 2 एमपी लेन्स आहे. याशिवाय फोनमध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16 एमपी कॅमेरा उपलब्ध असेल.

Realme 8i स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ड्युअल सिम, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स यात देण्यात आले आहेत.(Twitter वर आता शिविगाळ केल्यास 7 दिवसांसाठी ब्लॉक होणार अकाउंट- रिपोर्ट्स)

Realme 8i स्मार्टफोन 4GB RAM + 64GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज प्रकारात उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे 13,999 आणि 15,999 रुपये आहे. हा हँडसेट स्पेस ब्लॅक आणि पर्पल रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. 14 सप्टेंबरपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर या डिव्हाइसची विक्री सुरू होईल.ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, फोन खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफ बडोदा कडून 10 टक्के सूट मिळेल. याशिवाय, हा स्मार्टफोन दरमहा 486 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी केला जाऊ शकतो.