Realme 8 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Realme 8 5G (Photo Credits-Twitter)

Realme 8 5G launched in India : रिअलमी 8 5 जी स्मार्टफोन अखेर भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिंयट दिला गेला असून त्याची किंमत 14,999 रुपये आहे. तर 8GB रॅम 128GB स्टोरेज असणारा फोन तुम्हाला 16,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. फोनचा पहिला सेल येत्य 28 एप्रिलला दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर असणार आहे. फोन दोन कलर ऑप्शन Supersonic Black आणि Supersonic Blue मध्ये उपलब्ध करुन दिला जाणार आहे. फोनचे वजन 185 ग्रॅम आहे. तर थिकनेस 8.5mm आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, Realme हा सर्वात वजनाने हलका आणि सुपर स्लिम 5G स्मार्टफोन आहे.

कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. ज्याचे रेजॉल्यूशन 2400/1080 पिक्सल आहे. फोनचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. याचा स्क्रिन टू बॉडी रेश्यो 90.5 टक्के आहे. तसेच पीक ब्राइटनेस 600nits आहे. प्रोसेसरसाठी फोनमध्ये Demensity 700 5G चा वापर केला आहे. जो 7nm प्रोसेससर सह येणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, रिअलमी 8 5 जी भारतातील पहिला असा 5 जी फोन आहे जो Demensity 700 चिपसेटवर काम करणार आहे. यामध्ये पॉवरफुल ARM Mali G57 सपोर्ट मिळणार आहे. फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये वर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळणार आहे. ज्याच्या मदतीने 4GB रॅम हा 5GB आणि 8GB रॅम 11GB रॅममध्ये कन्वर्ट करता येऊ शकणार आहे. हा अॅन्ड्रॉइड 11 आधारित Realme UI 2.0 वर काम करणार आहे.(Acer Spin 7 5G Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्यं)

रिअलमीच्या या स्मार्टफोनमच्या रियर पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलसह B&W कॅमेरा आणि एक मॅक्रो लेन्सचा सपोर्ट मिळणार आहे. फोन 5 नाइट स्केप फिल्टरसह येणार आहे. फ्रंटला 16MP चा कॅमेरा दिला जाणार आहे. फोनला साइड माउंडेट फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. जी 18W फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज करता येणार आहे.