प्रसिद्ध लॅपटॉप ब्रँड एसरने (Acer) आपला सर्वात पहिला 5G कर्न्व्हटेबल लॅपटॉप भारतात लॉन्च केला. स्पिन 7 (Spin 7) असे या लॅपटॉपचे नाव असून बुधवारी याचे लॉन्चिंग करण्यात आले. स्पिन 7 मध्ये स्नॅपड्रॅगन 8cx Gen 2 5G प्रोसेसर दिला असून याची किंमत 1,34,999 पासून सुरु होते. एसर ऑफलाईन स्टोअर्स, ऑनलाईन स्टोअर्स आणि इतर पार्टनर स्टोअर्समध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळेल. या लॅपटॉपमध्ये 14 इंच कर्न्व्हटेबल लॅपटॉप स्क्रिन दिली असून मॅनेजियम-अल्युमिनियम alloy body दिली आहे. (Acer Swift 3 Notebook भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)
Snapdragon 8cx Gen 2 5G प्रोसेसर सह असलेला हा आमचा पहिला 5 G लॅपटॉप भारतामध्ये लॉन्च करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. या लॅपटॉपमध्ये सुपरफास्ट 5G कनेक्टीव्हीटी खूप दिवसांची बॅटरी लाईफ आणि उत्कृष्ट प्रॉडक्टिव्हीटी तुम्हाला मिळेल, अशी माहिती एसर इंडियाचे चीफ बिजनेस ऑफिसर सुधीर गोयल यांनी एका निवेदनात दिली.
Acer India Tweet:
Introducing the technology of tomorrow that powers your endless possibilities, Acer Spin 7.
It is flexible, comes with an all-day battery, and keeps you connected with the latest 5G functionality. https://t.co/VaI4JACOKc#NewLaunch #FlexibleLaptop #5Gconnectivity #AcerSpin7 pic.twitter.com/LLtbK8ioDY
— Acer India (@Acer_India) April 20, 2021
या लॅपटॉपमध्ये 360 डिग्री हिंजेस दिल्यामुळे तुम्ही याचा लॅपटॉप किंवा टचस्क्रिन डिव्हाईज म्हणून वापरु शकता. स्पिन 7 मध्ये मल्टीडे बॅटरी लाईफ सपोर्ट आहे. यासोबतच या लॅपटॉपमध्ये विंडोज 10 प्रो ही ऑपरेटिंग स्टिटम दिली असून तुमचा डेटा सेफ राहण्यासाठी इन्बिल्ड प्रोटेक्शन दिले आहे.
Windows Hello या नव्या फिचरमुळे फक्त फिंगरप्रींटचा वापर करुन तुम्ही तुमचा लॅपटॉप चालू करु शकाल. या फिचरमुळे लॅपटॉपची सुरक्षितताही वाढते. या लॅपटॉपमध्ये 5G कनेक्टीव्हीटी दिली असून ही कनेक्टीव्हीटी sub-6 GHz या फ्रिक्व्हेसिला सपोर्ट करतो. या स्पिन 7 सोबत तुम्हाला एसरचा Active Stylus देखील मिळतो. हा Stylus रिचार्जेबर असून यामध्ये 4096 लेव्हलचे प्रेशर सेन्सिटीव्ही आहे. या स्टायलसमुळे या डिव्हाईसचा एक अनोखा टचस्क्रीन अनुभव तुम्हाला मिळेल.