Realme 7 Smartphone’s First Online Sale: उद्या दुपारी 12 पासून रियलमी 7 स्मार्टफोनचा पहिला ऑनलाईन सेल; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
Realme 7 India Sale (Photo Credits: Realme India)

अलिकडेच लॉन्च करण्यात आलेल्या रियलमी 7 (Realme 7) या स्मार्टफोनचा पहिला ऑनलाईन सेल (Online Sale) उद्यापासून (10 सप्टेंबर) सुरु होत आहे. उद्या दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर (Flipkart) या ऑनलाईन सेलला सुरुवात होईल. तर रियलमी 7 प्रो (Realme 7 Pro) स्मार्टफोनचा सेल पुढील आठवड्यात फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. TUV Rheinland Reliability Verification ही टेस्ट पास करणारा पहिलाच स्मार्टफोन असल्याचे म्हटले आहे.

हा हँडसेट दोन रंगात उपलब्ध आहे- Mist White and Mist Blue. हा हँडसेट दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे- 6GB आणि 8GB. यापैकी 6GB वेरिएंटची किंमत 14,999 रुपये इतकी आहे तर 8GB रॅम असलेल्या वेरिएंटची किंमत 16,999 रुपये इतकी आहे.

रियलमी 7 मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून 90Hz चा रिफ्रेश रेट आहे. तसंच यात Corning Gorilla Glass 3 प्रोटेक्शनही देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G95 SoC प्रोसेसर असून 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.

प्रोसेसर MediaTek Helio G95 SoC
रॅम  8GB, 4GB
इंटरनल स्टोरेज (मेमरी) 64GB, 128GB
बॅटरी 5000mAh
बॅक कॅमेरा 64MP, 8MP, 2MP, 2MP
सेल्फी कॅमेरा 16MP
चार्जिंग सपोर्ट 30W डार्ट चार्गिंग सपोर्ट

Realme Tweet:

Realme 7 India Sale (Photo Credits: Realme India)
Realme 7 India Sale (Photo Credits: Realme India)

फोटोसाठी या स्मार्टफोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा सोनी IMX682 सेन्सरसह देण्यात आला आहे. तसंच यात 8MP ची अल्ट्रा व्हाईड अॅगल लेन्स, 2MP चा मायक्रो लेन्स आणि 2MP ची B&W लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच 5000mAh ची बॅटरी 30W डार्ट चार्जसह देण्यात आली आहे.