Realme 7 Pro Sun Kissed Leather Edition भारतात लाँच, 'या' दिवशी होणार या जबरदस्त स्मार्टफोनचा पहिला सेल
Realme 7 Pro Sun Kissed Leather Edition (Photo Credits; Twitter)

आपले एकाहून एक जबरदस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात चांगला जम बसवलेली कंपनी रियलमी ने आपला एक नवा स्मार्टफोन Realme 7 Pro स्पेशल एडिशन भारतात आणले आहे. या स्मार्टफोनला Realme 7 Pro Sun Kissed Leather Edition असे नाव देण्यात आले आहे. नुकताच हा फोन भारतात लाँच झाला असून लवकरच हा भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. याच्या जबरदस्त डिस्प्ले आणि कॅमेरा लाईफ ही स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये आहेत. येत्या 16 ऑक्टोबरला या स्मार्टफोनचा भारतात पहिला सेल होणार आहे. ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या Flipkart Big Billion Days मध्ये याचा पहिला सेल होईल.

या स्मार्टपोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर यात 6.4 इंचाची फुल एचडी डिस्प्ले पॅनलसह येते. याचे रिजोल्यूशन 1080x2400 पिक्सेल इतके आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 720G प्रोसेसरसह येतो. यात 6GB रॅम आणि 8GB रॅम असे दोन प्रकार देण्यात आले आहे. हा फोन पांढरा आणि नारिंगी अशा 2 रंगात उपलब्ध होईल. 16 ऑक्टोबरला हा फोन ऑफलाईन स्टोर्समध्येही खरेदी शकता. Realme C11 Launched in India Today: रिअलमी सी11 स्मार्टफोन केवळ 7,499 रुपयांमध्ये भारतात लॉन्च

याच्या 6GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 19,999 रुपये आहे. तर 8GB RAM +128GB स्टोरेजची किंमत 21,999 रुपये आहे. यात 64MP ा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर फोनमध्ये 8MP चा वाइड अँगल सेंसर, 2MP चा मोनोक्रोम आणि मॅक्रो सेंसर्स दिले गेले आहेत. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

याच्या बॅटरी विषयी बोलायचे झाले तर यात 4500mAhची बॅटरी देण्यात आली आहे. जो 65W सुपर डार्ट फास्ट चार्जिंगसह येतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी USB Type C चार्जिंग फिचर आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे.