चीनी स्मार्टफोन कंपनी रिएलमी आपला बहुचर्चीत स्मार्टफोन Realme 5 आणि 5 Pro भारतात उद्या म्हणजेच मंगळवार (20 ऑगस्ट 2019) रोजी लॉन्च करत आहे. या दोन्ही फोनच्या फिचर्सबाबत युजर्सनी आणि रिएलमीच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. ही उत्सुकता विचारात घेऊनच आम्ही येथे या फोनमध्ये कोणकोणते फिचर्स असू शकतात तसेच या फोनची किंमत किती असू शकते याबाबत काही माहिती देत आहोत.
Realme 5 Pro फिचर्स
डिस्प्ले - 6.53 inches (16.59 cm) आणि 1080 x 2340 pixels
रॅम - 6.0
इनबिल्ड स्टोरेज - 128 GB (से माइक्रोएसडी कार्ड च्या माध्यमातून Yes Up to 256 GB GB पर्यंत वाढवता येते.)
ऑपरेटिंग सिस्टम - Android v9.0 (Pie)
बॅटरी - 5000 mAh
प्रोसेसर - Ota core (2.3 GHz, Dual core, Kryo 360 + 1.7 GHz, Hexa Core, Kryo 360)
जीपीयू - अड्रेनो Adreno 616
कॅमेरा - अपर्चर F1.8 सोबत 16.0 मेगापिक्सल प्राइमरी आणि 48+8+5+2 MP मेगापिक्सल सेकंडरी सेंसर वाला कॅमरा सेटअप.
सेन्सर - Light sensor, Proximity sensor, Accelerometer, Compass, Gyroscope
कनेक्टिविटी - 4G (supports Indian bands), 3G, 2G सपोर्ट
इतर फिचर्स - जीपीएस, ब्लूटूथ, वाय-फाय आणि ओटीजी यांसह अनेक.
(हेही वाचा, Realme Days Sale on Flipkart: Realme 3 Pro सह रियलमी च्या या आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळताय भन्नाट सूट)
उद्या म्हणजेच मंगळवार (20 ऑगस्ट 2019) रोजी एका कार्यक्रमात रिएलमी आपला स्मार्टफोन Realme 5 Pro लॉन्च करत आहे. उद्या दुपारी 12.30 वाजता या कार्यक्रमास सुरुवात होईल. ज्यात या स्मार्टफोनचे लॉन्चिंग केले जाईल. Realme 5 Pro लॉन्च होत असताना तुम्ही लाईव्हही पाहू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला Realme च्या अधिकृत युट्युब पेजवर जावे लागेल. जिथे आपण Realme 5 Pro लाँचींग कार्यक्रम लाईव्ह पाहू शकता.