Realme Days Sale on Flipkart: Realme 3 Pro सह रियलमी च्या या आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळताय भन्नाट सूट
Realme 3 First Sale will start today (Photo Credits- Twitter)

स्मार्टफोन कंपनी Realme ने ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टसह (Flipkart) भागीदारी करून फ्लिपकार्टवर रियलमी डेज सेल सुरु केला आहे. हा सेल 19 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये रियलमी च्या Realme 3 Pro, Realme X,Realme 3i, Realme C2 सह ब-याच फोन्सवर आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. तसेच या सेलमध्ये अॅक्सि बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना अतिरिक्त 10% ची त्वरित सूट मिळणार आहे.

चला तर मग पाहूया या ऑफर्समध्ये मिळणा-या रियलमी स्मार्टफोन्स:

1. Realme 3 Pro

हा रियलमी सध्याचा स्मार्टफोन्समधील लोकप्रिय असा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनवर तुम्हाला 18% पर्यंतची सूट मिळत आहे. याच 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्टवर 12,999 रुपयांत मिळत असून 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन 15,999 रुपयांत मिळत आहे.

2. Realme 2 Pro:

या स्मार्टफोन्समवर तुम्हाला 25% पर्यंत सूट मिळत आहे. यातील 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज स्मार्टफोनची किंमत 10, 490 रुपये असून तुमच्या जुन्या स्मार्टफोन्सवर अतिरिक्त 10,000 रुपयांची सूट मिळत आहे. तर 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज स्मार्टफोन तुम्हाला 12,490 रुपयांत मिळत आहे.

3. Realme X:

या स्मार्टफोनमध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन 16,999 रुपयांत मिळत आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन 19,999 रुपयांत मिळत आहे. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 17,999 रुपयांत मिळत आहे.

4. Realme C2:

यात तुम्हाला 2GB रॅम आणि 16GB अंतर्गत स्टोरेज असलेला स्मार्टफोन तुम्हाला 5,999 रुपयांत मिळत आहे. तर 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन 6,999 रुपयांत मिळत आहे. तर याच्या तिस-या प्रकारात ज्यात 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेज असलेला स्मार्टफोन 7,999 रुपयांत मिळत आहे.

5. Realme 3i:

ह्या स्मार्टफोनचा सेल हा उद्यापासून म्हणजेच 20 ऑगस्टला दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. यात 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपयांत मिळत असून, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजची किंमत 9,999 रुपये आहे. सध्या तरी या स्मार्टफोनवर कोणत्याही प्रकारची एक्सचेंज ऑफर ठेवण्यात आलेली नाही.

हेही वाचा- जबरदस्त कॅमेरा फिचर्स असलेले Realme X आणि Realme 3i आज भारतात होणार लाँच

रियलमी चे हे सर्व स्मार्टफोन्स आपल्या आकर्षक फिचर्समुळे खास आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्यातील कोणताही तुमचा आवडता स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टवरील हा सेल तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल.