शाओमी, ओप्पो सह रियलमी स्मार्टफोन देखील भारतात खूप लोकप्रिय होत आहे. रियलमी च्या आतापर्यंतच्या स्मार्टफोनन्सने आकर्षक फिचर्समुळे ग्राहकांची मने जिंकली. त्या यादीत आता अजून 2 स्मार्टफोन्स समाविष्ट होणार आहे. रियलमी एक्स (Realme X) आणि रियलमी 3i (Realme 3i) हे स्मार्टफोन्स आज भारतात लाँच होणार आहेत. रियलमी एक्स कंपनीचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन असून यावर्षी मे महिन्यात तो लाँच करण्यात आला होता. तर रियलमी 3 हा स्मार्टफोन सर्वप्रथम भारतात लाँच होणार आहे.
रियलमी X ची खास वैशिष्ट्ये:
या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून यात 8GB रॅम आणि 128 GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. हा 710 स्नॅपड्रॅगन SOc प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सेल आणि 5 मेगापिक्सेल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3765mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
रियलमी 3i ची खास वैशिष्ट्ये:
स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB चे अंतर्गत स्टोरेज असू शकते. या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सेल आणि 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा असू शकतो. यात सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसेच यात 3765mAh क्षमतेची बॅटरी असू शकते.
भारतात 5G नेटवर्क सुरु होण्याआधी तयार आहे RealMe 5G स्मार्टफोन
रियलमी 3i हा स्मार्टफोन सर्वात स्वस्त स्मार्टफोन असू शकतो असे सांगण्यात येत आहे. मात्र त्याची अधिकृत किंमत लाँच झाल्यानंतरच कळेल.